पुणे! कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; नामांकित बिल्डरचं नाव चर्चेत…

पुणे: पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात सकाळी जॉंगिंग करण्यासाठी गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला भरधाव कारने चिरडल्याची थरारक घटना शुक्रवारी (ता. ११) घडली आहे. या अपघातात वीरेंद्र द्विवेदी (वय 38) या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी धडक देणारी इनोव्हा कार जप्त केली असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे.

विरेंद्र द्विवेदी हे दररोज सकाळी पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात सकाळी जॉगिंगसाठी जात असत. शुक्रवारी देखील ते नेहमीप्रमाणे रस्त्याच्या कडेने धावत असताना एका अत्यंत वेगात आलेल्या इनोव्हा कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, द्विवेदी हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले. अपघातानंतर त्यांना तातडीने त्याच कारमधून उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

अपघाताची माहिती मिळताच चतु:शृंगी पोलिस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेली इनोव्हा कार जप्त केली आहे. संबंधित कार पुण्यातील एका प्रसिद्ध बिल्डरच्या कंपनीच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. या अपघातात कारचा वेग किती होता, चालकाचे वाहनावरील नियंत्रण का सुटले, तसेच चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

दरम्यान, पोलिसांनी कारचालकाची अधिकृत ओळख आणि त्याच्याबाबतच्या दाव्यांची पुष्टी केलेली नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, चतु:शृंगी पोलिस परिसरातील सर्व सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासत आहेत. याशिवाय, संशयित चालकाची वैद्यकीय तपासणी केली आहे. पोलिसांचा अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच अपघाताचे नेमके कारण आणि कार चालवणाऱ्या व्यक्तीची अधिकृत माहिती स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पुणे अपघात! कारला चावी तशीच राहिली अन् 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक…

पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…

पुणे! मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून युवकाचं अपहरण; पोलिस अधिकाऱ्याचे 21 कॉल अन् थरारक पाठलाग…

पुणे! पोलिसाच्या मारहाणीनंतर थेट कोमात; शुद्धीवर आल्यानंतर गुन्हा दाखल अन् निलंबीत…

पुणे शहरात गांजा पिणाऱ्यांनी पोलिसाचा चिरला कोयत्याने गळा..

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!