
आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…
नवी दिल्ली : हरियाणातील गुरुग्रामधील एका युवतीला फसवणूक करणाऱ्यांनी मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी म्हणून फोन केला आणि स्काईपवर तिची सुमारे अडीच तास चौकशी केली. आरोपींनी मनी लाँड्रिंगचे आरोप करत तिला पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. या प्रक्रियेमध्ये पीडितेची सुमारे सात लाख रुपयांची फसवणूक झाली. साक्षी गुप्ता असे पीडित युवतीचे नाव असून, ती आयटी इंजिनिअर म्हणून काम करते.
पीडित युवती, तिचा पती, पोलिस आणि बँक यांच्या संयुक्त प्रयत्नांतून सुमारे दोन महिन्यांनंतर हे पैसे परत मिळाले आहेत. साक्षी गुप्ताने सांगितले की, ३ ऑक्टोबर रोजी एका व्यक्तीचा फोन आला होता. आपण FedEx कुरिअर कंपनीतून बोलत असल्याचा दावा त्याने केला होता. तिचं एक कुरिअर सीमाशुल्क विभागाने पकडल्याचे त्याने सांगितले. पण, साक्षीने आपण काहीच ऑर्डर केले नाही म्हणून सांगितले. पण, कॉलरने तिचा आधार कार्ड क्रमांक सांगितला. तिचा आधार आयडी बेकायदेशीर कामांशी जोडला गेला आहे, असेही त्याने सांगितलं. साक्षीने अधिक माहिती विचारण्याआधीच तिचा कॉल मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँचशी कनेक्ट करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
आरोपीने मला स्काईप कॉलमध्ये सहभागी होण्यास सांगितले. मला माझा कॅमेरा आणि माईक सतत चालू ठेवणे बंधनकारक केलं. मी घाबरले आणि तो जे काही बोलला ते ऐकत गेले. मी स्काईपवर त्याच्याकडे असलेला लोगो तपासला असता, तो मुंबई पोलिसांच्या लोगोशी जुळला. त्याने सांगितले की, माझ्या आधार क्रमांकाशी मनी लाँड्रिंगची अनेक प्रकरणं लिंक आहेत. व्हिडिओ कॉलदरम्यानच त्याने बँक तपशील आणि प्रायमरी आणि सेंकडरी अकाउंट नंबर मागितले. पण, ते दिले नाहीत. बँक खाती मनी लाँड्रिंगशी जोडलेली आहेत की नाहीत याची पडताळणी बँक आणि संबंधित विभागांना करावी लागेल, असे त्या कॉलरने तिला सांगितलं. त्यासाठी 2,80,931 आणि 3,92,008 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. 15 मिनिटांत पैसे परत केले जातील असे आश्वासनही त्याने साक्षीला दिले. साक्षीनं सांगितल्याप्रमाणे पैसे ट्रान्सफर केले. पण, दोन्ही ट्रान्झॅक्शन होताच कॉल डिस्कनेक्ट झाला.
करणाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे साक्षीच्या लक्षात आले. त्यानंतर, हे पैसे परत मिळवण्यासाठी साक्षी आणि तिचा पती अर्पित गांधी यांनी खूप प्रयत्न केले. बँकेने आरोपींची बँक अकाउंट फ्रीज करण्याचे आदेश दिले. पण, गेलेले पैसे परत मिळणार नाहीत असेही सांगितले. आम्ही डीसीपी (दक्षिण) सिद्धांत जैन यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला सिव्हिल कोर्टामध्ये जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर कोर्टाने पोलिसांना नोटीस पाठवून पैसे मिळवण्याचे आदेश दिले. पोलिसांनी कोर्टाचे हे आदेश गुवाहाटी आणि मुंबईतील शाखांना पाठवले जिथे पैशांचा तपास लागला होता. त्यानंतर आमचे पैसे आमच्या खात्यात जमा करण्यात आले. या रकमेचा पहिला हप्ता 1 डिसेंबरला आणि दुसरा हप्ता 5 डिसेंबरला मिळाला आहे, असे साक्षी आणि अर्पितने सांगितले.
सायबर गुन्हेगाराने खासदाराला घातला लाखो रुपयांचा गंडा…
युवतीची फसणवूक करणाऱ्यास सायबर पोलिसांनी घातल्या बेड्या…
मुंबई पोलिसांच्या बनावट वेबसाईटप्रकरणी गुन्हा दाखल; बनावट वेबसाइट कशी ओळखाल…
लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्…
युवतीशी चॅटींग आणि गोड बोलण्याला भुलला युवक अन् पुढे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

