मिलिंद एकबोटे यांच्यासह 3 जणांवर गुन्हा दाखल…

पुणे : पुणे महापालिकेसमोर बेकायदेशीर आंदोलन केल्यामुळे समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह 3 जणांवर पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्येश्वर पुनर्वसन समितीचे अध्यक्ष कुणाल कांबळे, मिलिंद एकबोटे, किरण शिंदे, विशाल पवार अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

बेकायदेशीर आंदोलन आणि प्रक्षोभक भाषणं केल्यामुळे मुस्लीम संघटना आक्रमक झाल्या होत्या. गुन्हा दाखल न केल्यास त्यांनी मोठ्या आंदोलनाचा इशारा दिला होता. 4 सप्टेंबर रोजी पुण्येश्वर मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकाम हटवावे यासाठी महापालिकेबाहेर आंदोलन केले होते. चिथावणीखोर भाषण, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्याचवेळी भाजप नेते नितेश राणे यांनी देखील यावेळी प्रक्षोभक भाषणे केल्याचा आरोप होता. त्यानंतर नितेश राणे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान, पुणेश्वर मंदिराच्या परिसरातील दर्ग्याचा वाद जुना आहे. याच मंदिराचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याच मंदिर परिसरात अतिक्रमण हटवण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यावेळी आमदार नितेश राणे आणि महेश लांडगे यांनी समजात तेढ निर्माण करणारी वक्तव्य केल्याचा आरोप मुस्लीम संघटनांनी केला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पुणे शहरात खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या वृध्द महिलेची केली सुटका…

बदला! मंगला टॉकिजसमोर घडलेल्या खुनप्रकरणी चौघांना अटक; पाहा नावे…

पुणे शहरातील वकिलास दंडासह दोन वर्षे कारावासाची शिक्षा…

पुणे महानगरपालिकेजवळ महिलेचा विनयभंग करणारा ताब्यात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!