
कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या दहा वासरांची अपघातामुळे सुटका…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): कत्तलीसाठी घेऊन चाललेल्या दहा वासरांची मंचर पोलिसांनी सुटका केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी गावजवळ असलेल्या पूजा हॉटेल जवळ अष्टविनायक महामार्गावर सुमारे वीस हजार रुपये किमतीची काळे, पांढरे, तांबडे अशा रंगाची शिंगे नसलेली लहान जर्सी गाईची दहा वासरे सर्वांचे अंदाजे वय दहा दिवस कत्तलीसाठी घेऊन जात असताना तसेच दीड लाख रुपये किंमतीची महिंद्रा कंपनीची पिकअप एम. एच 14एफ 8356 पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
सदर गुन्हा पिकअप गाडीच्या किरकोळ अपघातामुळे उघडकीस आला आहे. बेदरकार गाडी चालवून ड्रायव्हर जखमी झाला आहे. निलेश नायलिंग काळे (रा. अवसरी ता. आंबेगाव जि. पुणे) सदर व्यक्ती जवळ वैद्यकीय अधिकारी यांचे फिटनेस प्रमाणपत्र, जनावरे वाहतूक करण्याचा परवाना नसल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी सपोनि थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सांगडे करत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात कत्तलीसाठी डांबली जनावरे अन् पोलिसांवर जीवघेणा हल्ला…
गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १७ जनावरांची केली सुटका…
लातूर पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १५ बैलांची केली सुटका…
गोंदिया पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या २४ जनावरांची केली सुटका…
गो तस्करांच्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी जखमी…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

