प्रेम! पाकिस्तानात गेलेली अंजू लागली रडू म्हणतेय भारतात जायचे…

कराची (पाकिस्तान): फेसबुक फ्रेन्डच्या प्रेमात वेडी होऊन पाकिस्तानात आलेली अंजू पु्न्हा भारतात परतण्याच्या मार्गावर आहे. पण, अंजूला पुन्हा भारतात का जायचंय? पण कशासाठी? तसेच कायदेशीरदृष्ट्या ते किती शक्य आहे? आणि महत्त्वाचे म्हणजे तिला तिचे कुटुंबीय स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

अंजू हिने पाकिस्तानात आल्यानंतर मित्रासोबत विवाह केला आहे. यामुळे अंजू वर्मा उर्फ फातिमा झाली आहे. अंजूला आता भारताची आठवण येत आहे. अंजूला तिच्या दोन मुलांची आठवण येत असल्याचा दावा अंजूचा पाकिस्तानातील पती नसरुल्लाहने केला आहे. अंजू मानसिकदृष्ट्या अस्वस्थ आहे आणि ती आपल्या मुलांची खूप आठवण काढत आहे. आठवणीतून अनेकदा ती रडत आहे. त्यामुळे तिच्या आरोग्याचा विचार केला तर तिने भारतात परत जाणे योग्य राहिल, असे नसरुल्लाह याने म्हटले आहे.

दरम्यान, अंजूला जरी भारतात जायचे असले तरी तिचा पती तिला स्विकारणार का? हा खरा प्रश्न आहे. आमच्यासाठी तू केव्हाच मेलीस असे म्हणत तिच्या पतीने तिच्यासोबतचे सर्व संबंध काहीच दिवसांपूर्वी तोडले होते. त्यामुळे भारतात जाऊ इच्छिणाऱ्या अंजूसमोर मोठे प्रश्न असणार आहे. जयपूरला निघाले असे सांगून अंजू 20 जुलै रोजी घरातून निघून गेली होती. 22 जुलैपर्यंत ती पतीसोबत व्हॉट्सअॅपवर बोलत राहिली आणि पाकिस्तानात पोहोचताच तिने पतीला खरं काय ते सांगून टाकले. फेसबुक फ्रेन्डला भेटण्यासाठी पाकिस्तानात आली आहे. पण पुन्हा भारतात परतणार असल्याचा दावा तिने केला.

अंजूने थेट मित्रासोबतच लग्नगाठ बांधली. त्याआधी धर्मांतर केलं प्री वेडिंग फोटोशूट केले आणि पाकिस्तानची सून झालेल्या अंजूला आहेरांचा वर्षाव होऊ लागला. कुणी फ्लॅट गिफ्ट केला, तर कुणी धनादेश दिला. अंजूचा संसार छान सुरु असेल आणि ती तिथे रमली असेल, असे वाटत असतानाच तिला भारतात जाण्याचे वेध लागले आहेत.

दुसरीकडे पाकिस्तानमधून भारतात गेलेली सीमा हैदर भारतात चांगलीच रमली आहे. सीमा हैदर हिला भारतात राहायचे आणि अंजूला पाकिस्तानातून पुन्हा भारतात जायचे आहे.

अंजूला मिळाले कोट्यावधींचे गिफ्ट अन् सुरक्षेला दोघे जण…

Video: अंजूने पाकिस्तानातून अरविंदला फोन करून केली शिवीगाळ…

अंजूला पाकिस्तान सरकार नोकरी आणि घर देणार; शिवाय…

Video: पाकिस्तानात गेलेली भारतीय अंजू झाली फातिमा…

पाकिस्तानमध्ये गेलेली अंजू सनकी स्वभावाची; मित्राच्या घरी थांबली…

अंजूने सीमेपलिकडून धाडला संदेश; मीडियाला केली विनंती…

Video: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिचा नवीन व्हिडिओ समोर…

Video: सीमा हैदर हिने देवाला हात जोडून घातलं साकडं; म्हणाली…

पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिने गरोदरपणाबाबत केला खुलासा…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!