महाराष्ट्रातील कैद्यांना झाली पगारवाढ; पगार किती मिळतो पाहा…

मुंबई: कारागृहातील उद्योगांमध्ये काम करत असलेल्या कैद्यांना पगारवाढ करण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. यामुळे राज्यातील सात हजारांपेक्षा अधिक कैद्यांना लाभ होणार असल्याचे कारागृह विभागाने सांगितले. कारागृहातील कैद्यांना दिवसाला पाच ते दहा रुपयांची वाढ शनिवारपासून लागू झाली आहे. राज्यातील कारागृहांमध्ये विविध प्रकारच्या उद्योगांमध्ये सरासरी ७ हजार कैदी काम करत असतात. यामध्ये पुरुष कैदी ६३०० आणि महिला बंदी ३०० आहेत.

कैद्यांना दर तीन वर्षांनी दहा टक्के वाढ देण्याची तरतूद आहे. बंद्यांना पगारवाढ देण्यात यावी अशी विनंती करण्यात येत होती. त्यानुसार कारागृह व सुधारसेवा विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी २० ऑगस्टपासून कारागृहातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या सर्व बंद्यांना पगारवाढ लागू करण्याचे आदेश दिले आहेत.

कारागृह शेती उद्योगामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या, अन्नधान्ये उत्पादित केली जातात. शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, गाई-गुरे पालनही केले जाते. या पैशांचा वापर कैदी दैनंदिन गरजेच्या वस्तू कारागृह उपाहारगृहातून खरेदी करण्यासाठी तसेच स्वतःच्या कुटुंबीयांनाही मनिऑर्डर करून करतात. तर वकिलांची फी भरण्यासाठीही यातून मदत होते.

कैदी सुतारकाम, लोहारकाम, शिवणकाम, चर्मकला, हातमाग, यंत्रमाग, बेकरी, कागदकाम, फाउंड्री, कार वॉशिंग सेंटर, इस्त्रीकाम, गॅरेज, मूर्तिकाम इत्यादी कामे करत असून, कारागृह उद्योगाद्वारे विविध कपडे, खुर्ची, टेबल, कपाट, दरवाजे, खिडक्या, शाळेसह विविध युनिफॉर्म, सौंदर्यप्रसाधने इत्यादी तयार होते.

पगारवाढीनंतर दिवसाला मिळणारा पगार पुढीलप्रमाणेः
कुशल बंदी – ७४ रुपये
अर्धकुशल बंदी – ६७ रुपये
अकुशल बंदी – ५३ रुपये
खुल्या वसादतीत – ९४ रुपये

स्वातंत्र्यदिनी राज्यातील 186 कैद्यांची कारागृहातून होणार सुटका; पाहा यादी…

अमिताभ गुप्ता यांची संकल्पना! येरवड्यातील कैदी उपहागृहात बनवणार विविध पदार्थ…

येरवडा कारागृहातील कैद्यांकडे आढळले मोबाईल; गुन्हा दाखल…

ग्रेट भेटः पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता…

अमिताभ गुप्ताः आहार आणि व्यायाम हेच आरोग्याच्या यशाचे गमक!

येरवडा कारागृहात आढळले मोबाईल; कसे पोहचतात पाहा…

पोलिस कोठडी अन् न्यायालयीन कोठडीतील फरक?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!