
बीडमध्ये पोलिसांसाठी नवा आदेश, आडनाव घ्यायचं नाही; कारण…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण प्रचंड ढवळून निघाले आहे. बीड जिल्ह्यातील सरकारी अधिकारी, पोलीस प्रशासन अशा सगळ्यांनाच या जातीयवादाचा फटका बसत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवनीत काँवत यांनी आज (मंगळवार) एक महत्त्वाचा आदेश जारी केला. त्यानुसार आता बीड पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना एकमेकांना पहिल्या नावाने हाक मारणे बंधनकारक करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीपासून मराठी विरुद्ध वंजारी हा सुरु झालेला वाद देशमुख हत्याप्रकरणानंतर आणखी उफाळला होता. त्यामुळे बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा आणि सौहार्द नष्ट होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. बीड पोलीस अधीक्षकांना बीड मधील जातीयवाद कमी करण्यासाठी पाऊल उचलले आहे. पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक अनोखा आदेश लागू केला. यापुढे पोलिसांनी एकमेकांना फक्त पहिल्या नावानेच बोलवायचे, आडनाव घ्यायचे नाही, असे आदेशात म्हटले आहे. पोलिस खात्यात एकाच जातीचे कर्मचारी असून ते आरोपींना सहकार्य करत असल्याचाही आरोप झाला. त्यामुळे जातीय भेदभाव नष्ट करण्यासाठी हा आदेश लागू केला आहे.
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या काळात बीडमध्ये काही आंदोलकांनी जाळपोळ केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यात मराठा विरुद्ध वंजारी असे जातीय ध्रुवीकरण झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना पराभवाचा धक्का बसला होता. यानंतर वंजारी समाजात तीव्र पडसाद उमटले होते. अनेक शाळांमध्ये लहान मुलांमध्येही आपापसात जातीय भेदभाव झाल्याच्या घटना बीड जिल्ह्यात घडल्या होत्या. त्यामुळे बीडमधील सामाजिक परिस्थितीबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती पुढे आली आहे.
बीड पोलिसांची आणखी एका गँगवर मकोका अंतर्गत कारवाई…
तृप्ती देसाई यांनी वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या पोलिसांची नावं केली जाहीर! पाहा यादी…
वाल्मीक कराड याची प्रकृती खालावली; तुरुंगातून हलवलं, ICU मध्ये उपचार सुरू…
वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी…
वाल्मिक कराड याला 7 दिवसांची पोलिस कोठडी…
संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…
मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…
संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…
धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…
वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…
वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…
वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

