
पुणे शहरात विद्यानंद बापट यांना मारहाण! म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…
पुणे : पुणे शहरात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना आज (गुरुवार) मारहाण झाल्याची घटना घडली आहे. विद्यानंद बापट यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. याचदरम्यान, आज विद्यानंद बापट यांना मारहाण झाली आहे.
विद्यानंद बापट यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे धार्मिक संघटना, डीजेप्रेमी आणि ढोलवादक पथकातील अनेकजण नाराज झाले होते. विद्यानंद बापट यांनी यापूर्वी पुणे महानगरपालिकेच्या सभेत डीजेला विरोध केला होता. तेव्हाही गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि राजकीय व्यक्तींनी बापट यांना विरोध केला होता. तेव्हादेखील बापट यांना पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी बंदोबस्तात बाहेर काढले होते. मात्र, आता विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला आहे. त्यांना मारहाण करण्यात आली आहे.
View this post on Instagram
विद्यानंद बापट हल्ला झाल्यानंतर म्हणाले, ‘तुम्ही मला विचारत होतात तेव्हा एक वेडा आला आणि त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो, पोलिस नव्हते बघून हल्ला केला. पोलिसांकडे रिव्हॉल्व्हर नाही. मी म्हणतोय ना, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…चिप प्रसिद्धीसाठी हल्ला केला. सवंग प्रसिद्धीसाठी त्याने माझ्यावर हल्ला केला. या सगळ्याचे व्हिडीओ फुटेज आहे, ते पोलिसांनी बघून कारवाई करावी. त्याला पोलिस चौकीत घेऊन तुडवून काढा. म्हणजे मुद्द्याचे उत्तर गुद्द्याने द्यायचे नसते, हे त्याला कळेल. त्याला सरळ सांगून कळणार नाही. त्याच्याशी काय युक्तिवाद करणार का, झोंबीसोबत युक्तिवाद होतो का? उत्सव सार्वजनिकरित्या साजरा करताना ध्वनीप्रदूषण होणार नाही आणि रहदारीस अडथळा होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, हे माझे म्हणणे आहे. बाकी तुम्ही उत्सव साजरे करु शकता. त्याबाबत मी आक्षेपच घेतलेला नाही. सवंग प्रसिद्धीसाठी माझ्यावर हल्ला करण्यात आला.’
विद्यानंद बापट यांच्या एका श्लोकची महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्याद् गर्दभरोहणम्…असं विद्यानंद बापट म्हणाले. या श्लोक सोशल मीडियावर सगळ्यांनाच भुरळ पाडली आहे. सोशल मीडियावर या श्लोकावर अनेक रिल्सही बनवण्यात आल्या आहेत. या श्लोकाचा अर्थ काय असा प्रश्न सगळ्यांना पडला होता तर आता विद्यानंद यांनीच याचा अर्थ बोलून दाखवला आहे, “मडके फोडावे, वस्त्र फाडावे आणि गाढवावर बसावे; पण कोणत्याही प्रकारे प्रसिद्ध व्हावे, असा आहे.
दरम्यान, विद्यानंद बापट यांच्यामागे कोणताही राजकीय, सामाजिक असा मोठा परिचय नाही. विद्यानंद सामान्य कुटुंबातील सामान्य व्यक्तिमत्व आहेत. विद्यानंद बापट (वय ३७) हे बीपीओ क्षेत्रात काम करतात. त्यांचे बहुतांश काम हे घरातूनच सुरू असते. मुळचे रत्नागिरीचे असलेले विद्यानंद बापट गेल्या 8 वर्षांपासून पुण्यातील नारायण पेठ येथे राहत आहेत. विद्यानंद बापट यांनी मुंबई विद्यापिठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली असून पुण्यातील पुरोगामी संघटनांच्या विविध उपक्रमांमध्ये ते सक्रियपणे सहभागी होत असतात.
पुणे! पोलिसाच्या मारहाणीनंतर थेट कोमात; शुद्धीवर आल्यानंतर गुन्हा दाखल अन् निलंबीत…
पुणे जिल्ह्यात युवकाची सपासप वार करून निर्घृण हत्या; थरार CCTV कॅमेऱ्यात कैद…
पुणे रेल्वे स्थानकावर मिझोरममधील महिलेकडून साडेतीन कोटींचे ड्रग्ज जप्त…
पुणे शहरातील कसबा पेठ हादरली! नवऱ्याने दाबला रिव्हॉल्व्हरचा ट्रिगर अन्…
पुणे! ‘माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस? एक्स बॉयफ्रेंडवर कोयत्यानं हल्ला…

