
लोणावळा येथे रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत हेल्मेट वाटप अन् बाईक रॅली…
पुणे (लोणावळा): शिवाजी चौक लोणावळा येथे दुचाकी गरजू लोकांना हेल्मेट वाटप करून बाईक रॅली काढण्यात आली व वाहतूक नियमांचे जनजागृती करण्यात आली.
खंडाळा हद्दीत ३६ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत शिवाजी चौक लोणावळा या ठिकाणी डॉ. सुरेश कुमार मेकला, अपर पोलिस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे संकल्पनेतून विक्रांत देशमुख, पोलिस अधीक्षक, पुणे प्रादेशिक विभाग पुणे, सुहास जगताप पोलिस निरीक्षक लोणावळा शहर पोलिस स्टेशन, किशोर धुमाळ पोलिस निरीक्षक लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन, सपोनि स्वप्निल पाटील प्रभारी अधिकारी, म. पो. केंद्र खंडाळा, पोसई सुनिल महाजन, ग्रेड पोसई इब्राहीम शेख, ग्रेड पोसई विजय शेटे म. पो. केंद्र खंडाळा व म. पो. केंद्र खंडाळा व लोणावळा शहर पोलिस स्टेशन मधील पोलिस अमंलदार यांचे उपस्थितीमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रम २६/०१/२०२५ रोजी १०:३० १३:०० वाजेच्या दरम्यान घेण्यात आला.
विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
सदर कार्यक्रमात पोलिस अधीक्षक यांनी वाहतूक सुरक्षा, वाहतुकीचे नियम व काळजी, सिटबेल्ट व हेल्मेट वापरबाबतची काय गरज आहे? याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गरजु लोकांना हेल्मेट वाटप झाल्यानंतर कुमार चौक लोणावळा ते खंडाळा दरम्यान दुचाकीवरून रस्ता सुरक्षा अंतर्गत बाईक रॅली काढून जनजागृती करण्यात आली. सदर वाहतूक जनजागृती कार्यक्रम मध्ये वरिष्ठांच्या हस्ते ३०० गरजू लोकांना हेल्मेचे वाटप करण्यात आले. सदर जनजागृती आणि हेल्मेट वाटप कार्यक्रमास पत्रकार, लोणावळा व खंडाळा गावातील मान्यवर व ५०० लोक उपस्थित होते.
पोलिस भरती! सरकार 10 हजार पदांची करणार भरती…
लोणावळा परिसरात सत्यसाई कार्तिक यांच्या कारवायांचा धडाका सुरूच…
लोणावळा येथे सत्यसाई कार्तीक यांनी संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत मोठी कारवाई…
Video: पुणे ग्रामीण पोलिस दलाची दमदार कामगिरी…

