फ्रँकफर्टहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडिया विमानाचे जयपूरला आपत्कालीन लँडिंग; सर्वत्र हाय अॅलर्ट…

जयपूरः फ्रँकफर्टहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर, सुरक्षेच्या कारणास्तव विमान त्वरित जयपूर विमानतळावर उतरवण्यात आले. आपत्कालीन लँडिंग केल्यानंतर प्रवाशांना उतरवण्यात आले आणि विमान सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. सध्या सुरक्षा यंत्रणांकडून विमानाची कसून तपासणी करण्यात येत असून, बॉम्बच्या धमकीतील सत्यता पडताळून पाहण्यात येत आहे.

बुधवारी सकाळी फ्रँकफर्टहून दिल्लीकडे येणारे एअर इंडियाचे विमान बॉम्बच्या धमकीनंतर जयपूरला वळवण्यात आले, असे वृत्तसंस्था पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे.

बोईंग ७८७-९ विमानाद्वारे संचालित फ्लाइट क्रमांक एआय २०३० या विमानाने जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्कालीन लँडिंग केले आणि सुरक्षा तपासणीसाठी त्याला आयसोलेशन बे मध्ये नेण्यात आले आहे.

मालवीयनगरचे सहायक पोलीस आयुक्त शिव दयाल म्हणाले, की बॉम्बच्या धमकीनंतर फ्रँकफर्ट-दिल्ली विमानाचे आपत्कालीन लँडिंग झाल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने पोलिसांना दिली होती.

विमान मुंबई फ्लाइट इन्फॉर्मेशन रीजनमध्ये (एफआयआर) असताना, वैमानिकाने विमानामध्ये बेकायदा हस्तक्षेप झाल्याचे दर्शवण्यासाठी स्क्वॉक कोड ७५०० दाबला. विमानात असलेल्या प्रवाशांची संख्या लगेच कळू शकली नाही. पुढील तपशीलांची प्रतीक्षा आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!