भावकीमध्ये असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने घेतला मोठा निर्णय…

छत्रपती संभाजीनगर : पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिल्लोड शहराजवळ असलेल्या रजाळवाडी येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्रदीप गंगाराम आरके असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीच्या पत्नीचे एका दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध होते. या त्रासाला कंटाळून पतीने टोकाचे पाऊल उचलले आहे. पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे, असे प्रदीप यांच्याजवळ आढळून आलेल्या सुसाईट नोटमध्ये आढळून आले आहे.

प्रदीप आरके यांनी रजाळवाडी परिसरातील एका आंब्याच्या झाडाला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी जगन्नाथ गंगाराम आरके यांच्या तक्रारीवरून सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात अनिता प्रदीप आरके आणि प्रियकर भाऊसाहेब विजय आरके यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् वहिनीचे आणखी…

अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…

बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…

माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…

धक्कादायक! प्रेम प्रकरणातून युवकाला जखमी अवस्थेतच फेकले विहिरीत अन्…

औरंगाबाद हादरले! मंदिरातून घराकडे निघालेल्या चिमुकलीवर अत्याचार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!