अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…

धाराशिव (प्रतिक भोसले): राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या आणि पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) भरतीची तयारी करणाऱ्या बालाजी बळीराम भंडारे (वय ३४, रा.वाडी बामणी, ता. जि. उस्मानाबाद (धाराशिव) यांनी घरमालकीनीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

घर मालकीण असलेल्या शुभांगी नंदु जगताप या महिलेबरोबर अनैतिक संबंध होते. महिलेच्याच बेडरूम मध्ये १० ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. भंडारे यांच्या पत्नीमुळे ही घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्या महिलेला अटक करून बुधवारी (ता. १६) रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपी महिलेला १८ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद (धाराशिव) तालुक्यातील बामणी येथील नानासाहेब अंबादास लांडे-पवार यांची मुलगी कल्याणी हिचे लग्न शेजारील वाडी बामणी येथील बळीराम किसन भंडारे यांचा लहान मुलगा बालाजी बळीराम भंडारे यांच्याशी २०१६ साली झाले होते. ते उस्मानाबाद (धाराशिव) मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. ते गावातूनच जाणे – येणे करत होते. त्या मुळे त्यांना कधी कधी ऑफीसला जाण्यासाठी उशीर होत होता. त्या मुळे त्यांनी उस्मानाबाद (धाराशिव) मध्ये साईराम नगर येथील शुभांगी नंदू जगताप यांच्या घरी एक रूम भाड्याने करून घेतली आणि तिथे ते राहात होते. शिवाय, खात्याअंतर्गत निघणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक (पी.एस.आय.) भरतीची पण ते तयारी करत होते. घरी अभ्यास होत नसल्याने कधी कधी ते तिथे राहूनच अभ्यास करायचे.

१० ऑगस्ट रोजी दुपारी फिर्यादी नानासाहेब लांडे-पवार (मयताचे सासरे) हे शेतात काम करत असताना त्यांना त्यांची मुलगी कल्याणी हिने फोन करून सांगितले की, यांना काही तरी झाले आहे, त्यांना हॉस्पिटल मध्ये ॲडमिट केले आहे. त्यावर ते उस्मानाबाद (धाराशिव) सरकारी दवाखान्यात गेले तेव्हा त्यांनी बघितले की, जावई हा मयत झाला होता. आणि त्यांच्या गळ्यावर काही संशयास्पद निशाण दिसले. तेव्हा त्यांना काही तरी घातपात झाल्याचा संशय आल्याने त्यांनी नातेवाईकांना विचारले तेव्हा त्यांना सांगितले की, ते भाड्याने राहत असलेल्या घराची घरमालकीण शुभांगी नंदू जगताप हिच्या बेडरूम मध्ये दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या दरम्यान त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी वाडी बामणी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. बालाजी यांची पत्नी कल्याणी हिने सांगितले की, ते ज्या ठिकाणी भाड्याने राहत होते. त्या घर मालकीणचे आणि ह्यांचे अनैतिक संबंध होते. ती घरमालकीण सतत यांना फोन करून संबंध ठेवण्यासाठी तसेच इतर मार्गाने पैशांची मागणी करत होती, त्रास देत होती. असे त्यांनी मला सांगितले होते. ‘मी काय करू ग मी खूप परेशानी मध्ये आहे. मला काय कळत नाहीये’ असे ते सारखे म्हणत होते. दरम्यान ही आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप करीत खुनाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी कुटुंबाने केली होती.

मयत बालाजी बळीराम भंडारे हे उस्मानाबाद (धाराशिव) शहरातील बार्शी रोड येथील साईराम नगर येथे शुभांगी जगताप यांच्या घरी भाड्याने राहत होते. त्यांनी १० ऑगस्ट रोजी दुपारी दोन ते अडीच वा.सु. भाड्याने राहत असलेल्या शुभांगी नंदु जगताप हिच्या बेडरुममध्ये तीच्याच साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी शुभांगी नंदु जगताप (रा. साईराम नगर) हिच्या त्रासास कंटाळून बालाजी भंडारे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचे सासरे नानासाहेब अंबादास लांडे-पवार (रा. बामणी ता. जि. उस्मानाबाद (धाराशिव) यांनी १४ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलिस ठाण्यात भा.दं.वि.सं कलम – ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. त्यानंतर पोलिसांनी घरमालकीन शुभांगी जगताप हिला अटक केली होती. तिला न्यायालयात हजार केल्यानंतर न्यायालयाने दोन दिवसांची १८ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

महिला पोलिस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…

पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…

पंढरपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा हल्ल्यात मृत्यू…

पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!