औरंगाबाद हादरले! मंदिरातून घराकडे निघालेल्या चिमुकलीवर अत्याचार…
औरंगाबाद: मंदिरातून घराकडे निघालेल्या चार वर्षीय चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना वाळूज भागात घडली आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अवघ्या एका तासात जेरबंद केले आहे. संभाजी होनाजी धवारे (वय 35, रा. सारा विहार वाळूज मूळ गाव रा. दैठण ता. गेवराई जि.बीड) असे आरोपीचे नाव आहे.
वाळूज जवळील पंढरपूर येथे गुरुवारी (ता. 17) रात्रीच्या सुमरास ही घटना घडली आहे. चिमुकलीचे घर पंढरपूर येथील एका मंदिराच्या पाठीमागेच आहे. दरम्यान याच मंदिरात सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मंदिरात दररोज हरिपाठ असतो. चिमुकली हरिपाठ सुरू झाल्यावर मंदिरात गेली होती. काही वेळानंतर मंदिराच्या बाहेर पडली आणि आरोपी कंपनीतून त्याच रस्त्याने घरी परतत होता. अंधाराचा फायदा घेत त्याने चिमकलीचे अपहरण केले आणि तिच्यावर अत्याचार केला.
आरोपी संभाजी धवारे एका कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून कामाला आहे. गुरुवारी सायंकाळी 6 ते रात्री 11 च्या दरम्यान आरोपीने चिमुकलीचे अपहरण केले. तिच्यावर अत्याचार केला. चिमुकलीला वेदना होत असल्याने कुटुंबियांना धक्काच बसला. त्यामुळे त्यांनी तिची विचारपूस केल्यावर संतापजनक प्रकार समोर आला. त्यानंतर पालकांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या घटनेने पंढरपूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी तातडीने घटनास्थळाला भेट दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीच्या शोधासाठी तातडीने पथक स्थापन केले. पोलिस उपनिरीक्षक स्वाती उचित यांच्या नेतृत्वात पोलिस कॉस्टेबल प्रियंका तलावडे, कॉस्टेबल मतलबे, साळवे, सोहळे, डागे यांचे पथक स्थापन केले. रात्रीच मुलीच्या पालकांना सोबत घेत परिसर पिंजून काढला. आरोपीच्या वर्णनावरुन शोध घेतला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
भयानक Video: अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेत ऑनकॅमेरा बलात्काराचा प्रयत्न…
प्रियकरासमोर विधवा महिलेवर दोघांचा चालत्या जीपमध्ये बलात्कार…
महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित महाराजाला अटक…
धक्कादायक! पुणे जिल्ह्यातील शाळेच्या बाथरूमध्ये मुलीवर बलात्कार…
छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार…