
धक्कादायक! सरकारी अधिकाऱ्याकडून राहिली मित्राची मुलगी गरोदर…
नवी दिल्ली : एका सरकारी अधिकाऱ्याने मित्राच्या मुलीचे अनेक महिने लैंगिक शोषण करत तिच्यावर अत्याचार केल्याच्या घटनने एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे त्याला त्याच्या पत्नीनेही साथ दिली. पीडित मुलगी गर्भवती झाल्यावर मुलाच्या हाताने औषध मागवून त्याने या मुलीचा गर्भपातही केला. ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
दिल्ली सरकारच्या महिला आणि बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्या एका मित्राच्या 14 वर्षांच्या मुलीवर अनेक महिने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवाय, अधिकाऱ्याच्या पत्नीनेही त्याला मदत केली, असाही आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पीडित मुलगी बारावीची विद्यार्थिनी असून, तिच्या वडिलांचे 2020 मध्ये निधन झाले आहे. यानंतर आरोपीने पीडितेला त्याच्या घरी आणले होते. दरम्यान, आरोपीने 2020 आणि 2021 मध्ये पीडित मुलीवर अनेकदा बलात्कार केला. अल्पवयीन मुलगी गर्भवती झाली त्यावेळी आरोपीने याबाबत पत्नीला सांगितले. यानंतर त्याच्या पत्नीनेही त्याला साथ दिली. आपल्या मुलाच्या मदतीने औषध मागवून अल्पवयीन मुलाला दिले आणि तिचा गर्भपात करण्यात आला. यानंतर तिची प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीवर उपचार सुरू असून, तिची स्थिती गंभीर आहे. न्यायदंडाधिकार्यांसमोर तिचा जबाब नोंदवायचा अजून बाकी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांची दिल्ली पोलिस कसून चौकशी करत आहेत. या प्रकरणात, पीडितेच्या तक्रारीवरून, पोलिसांनी IPC कलम 376(2), 506, 509, 323, 313, 120B, 34IPC आणि POCSO कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सख्ख्या भावाकडून अल्पवयीन बहिण राहिली गरोदर…
पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदर हिने गरोदरपणाबाबत केला खुलासा…
भयानक Video: अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेत ऑनकॅमेरा बलात्काराचा प्रयत्न…
प्रियकरासमोर विधवा महिलेवर दोघांचा चालत्या जीपमध्ये बलात्कार…
अभिनेत्रीवर बलात्कार आणि मारहाण केल्याप्रकरणी एकाला अटक…