बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…

लखनौ (उत्तर प्रदेश): गाझियाबादमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरून एका महिलेने पतीच्या प्रेयसीचा भावांसह मिळून खून केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांना अटक केली आहे.

गाझियाबादमधील मुरादनगर येथे 3 ऑगस्ट रोजी हिंडन नदीच्या काठावर एका मुलीचा गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तपास केल्यानंतर व्यावसायिकाची पत्नीच खरी सूत्रधार निघाली आहे. रागिणी उर्फ ​​आरोही शहा असे मृत युवतीचे नाव आहे. रागिणी उर्फ ​​आरोही शहा हिची गाझियाबादमध्ये बांधकाम व्यावसायिकासोबत असलेल्या अनैतिक संबधावरून हत्या करण्यात आली होती. बांधकाम व्यावसायिकाच्या पत्नीनेच त्याच्या भावाला रागिणीची हत्या करायला सांगितली होती. पत्नीने तिच्या भावाला रागिणीचे घरातून अपहरण करायला सांगितले आणि नंतर तिचा खून करुन तिला पुलाखाली फेकून द्यायला सांगितले.

पोलिसांनी याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक बंटी सिंग, त्याची पत्नी राखी सिंग, मेहुणा अमित कुमार आणि त्याचे दोन मित्र करण उर्फ ​​केपी आणि अंकुर सिंग यांना अटक केली आहे. आरोपींकडून एक पिस्तूल, 2 काडतुसे आणि खुनासाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान, ‘रागिणी बंटीसोबत प्रॉपर्टी डील करत होती. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. रागिणीला अनेक गोष्टींची आवड होती. याच कारणामुळे रागिणी पतीपासून वेगळी राहत होती. रागिणीमुळे बंटी माझ्या बहिणीला त्रास देत होता. त्यामुळेच रागिणीला मार्गातून दूर करण्याची आमची योजना होती,’ असे आरोपीने तपासादरम्यान सांगितले.

दरम्यान, गाझियाबादमध्ये 3 ऑगस्ट रोजी हिंडन नदीच्या पुलाखाली रागिणीचा मृतदेह सापडला होता. दोन दिवसांनी तिची ओळख पटली होती. नोएडाची रहिवासी असलेली रागिणी आदित्य वर्ल्ड टॉवरमध्ये बंटी सिंग याच्या रिअल इस्टेट कंपनीत काम करत होती. रागिणीनेच बंटी सिंहसोबत अनैतिक संबंध होते. बंटीच्या पत्नीला याबाबत माहिती होती. त्यामुळे त्यांच्यात सातत्याने भांडणे होत होती. बंटीच्या पत्नीने रागिणीच्या हत्येची योजना आखली आणि भावाला त्यामध्ये सामील करुन घेतले. अमितने त्याच्या मित्रांना या कटामध्ये सहभागी करुन घेतले.

2 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अमित रागिणीच्या घरी पोहोचला होता. त्याने गाडीत बसूनच रागिणीला बोलावून घेतले आणि सोबत यायला सांगितले. रागिणीने घरी बंटीच्या पत्नीने बोलवले आहे असे सांगितले आणि ती निघाली. त्यानंतर अमित रागिणी हिला घेऊन हिंडन नदीच्या पुलावर घेऊन गेला. त्यावेळी आपल्यासोबत काय होणार आहे याची कल्पना रागिणीला आली. त्यामुळे ती पळू लागली. मात्र तितक्यात अमितने रागिणीवर गोळीबार केला. रागिणीचा मृत्यू झाल्यानंतर अमितने तिचा मृतदेह पुलाखाली फेकून दिला होता.

नवविवाहीत दाम्पत्याची आत्महत्या; सुसाईड नोट मध्ये लिहीले…

वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…

माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…

सुनेला भेटण्यासाठी तिचा प्रियकर उघडपणे घरी येतो अन्…

प्रेम! पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणून मारली नदीत उडी…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!