
पुणे जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुलींबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड…
पुणे: पुणे जिल्ह्यातील बारामती येथील दोन अल्पवयीन मुलींवर हडपसर परिसरातील चार जणांनी अत्याचार केला होता. त्यानंतर आणखी सात जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. ज्ञानेश्वर आटोळे, अनिकेत बेंगारे यश उर्फ सोन्या आटोळे अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
बारामती तालुका ग्रामीण पोलिसांनी तपास केल्यानंतर यापूर्वी या दोन मुलींवर बारामतीतीलच सात जणांनी अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी यामधील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
14 सप्टेंबर रोजी दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या वेगवेगळ्या फिर्यादी बारामती तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. या दोघी मुली शहरातील वेगवेगळ्या शाळांमध्ये नववीमध्ये शिक्षण घेत आहेत. परंतु त्या एकमेकींच्या मैत्रिणी आहेत. त्या 14 सप्टेंबरला घरात कोणाला काहीही न सांगता पुण्याला निघून गेल्या. बसने त्या पुण्यात पोहोचल्या होत्या. पुण्याला जाताना त्यांनी ज्ञानेश्वर आटोळे याच्याशी संपर्क साधला. मुलींपाठोपाठ तो ही बारामतीतून हडपसरला गेला. तेथे एका मित्राच्या खोलीवर या मुलींना नेण्यात आले. रात्री त्यांना दारु पाजून या तिघांसह अन्य एका आरोपीने त्यांचे आळीपाळीने लैंगिक शोषण केले.
दरम्यान, एका मुलीने हडपसरहून तिच्या आईला फोन केला. आईने बारामती तालुका पोलिसांना याची माहिती दिली. त्यानुसार तालुका पोलिसांनी हडपसर पोलिसांशी संपर्क साधला. बारामतीतून महिला पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांसह एक पथक हडपसरकडे रवाना झाले. 16 तारखेला या मुलींना पोलिसांनी बारामतीत आणले. येथे त्यांचे महिला पोलिसांकडून समुपदेशन केले जात असताना या दोघींनी दारु पाजून चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली.
तपासादरम्यान या दोन्ही मुलींनी पोलिस तपासामध्ये अजून सात जणांची नावे घेतली आहेत. या प्रकरणात आता सातही जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता एकूण अकरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी नवीन पुरवणीमध्ये या सात आरोपींत्या नावाचा समोवेश केला आहे. ओंकार भारती, ओम कांबळे, अप्पा शेंडे, अक्षय मडके, सूरज इंदलकर, संस्कार वाघमारे व श्रेणिक भंडारी (संपूर्ण नावे नाहीत) या सात जणांवर बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून या सातही जणांचा पोलिस शोध घेत आहेत.
पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…
पुणे जिल्ह्यात गर्भपात करुन नकोशीला जमिनीत गाडून अन् आईचाही मृत्यू…
संतापजनक! पुणे जिल्ह्यात चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार…
पुणे जिल्ह्यात शिक्षकाने शाळेत केला अल्वपयीन मुलीचा विनयभंग; पाहा कारनामे…
पुणे जिल्हा हादरला! बापानेच केला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…

