समृद्धी महामार्गावर फोटो, व्हिडीओ काढाल तर तुरुंगात जाल…

मुंबईः महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गावर फोटो किंवा व्हिडीओ काढणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. 500 रुपयांच्या दंडासोबत 1 महिन्यांच्या कारावासाचा इशारा महामार्ग वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गावर काही जण फोटो, रील काढण्यासाठी वाहतुकीस अडथळा आणत असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर महामार्ग वाहतूक पोलिसांसह जिल्हा वाहतूक शाखेने याची गंभीर दखल घेतली आहे. समृद्धीवर हुल्लडबाजी करणाऱ्यांना आता एक महिन्याची कैद आणि दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे.

काही युवक जीव धोक्यात घालून दौलताबाद रोडवरील समृद्धी महामार्गावरील पुलावर चढून फोटो आणि रील काढत आहेत. 80 ते 120 किमीच्या वेगाने जाणाऱ्या वाहनांना हात दाखवून वाहतुकीस अडथळा आणतात. असे केल्यास कलम 341 नुसार एक महिना कारावास किंवा 500 रुपये दंड तसेच कलम 283 नुसार सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही व्यक्तीला धोका किंवा इजा होईल, असे कृत्य केल्यास दोनशे रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे महामार्ग पोलिसांनी सांगितले आहे.

समृद्धी महामार्गावर अनेकदा वाहन चालक थांबून फोटो किंवा व्हिडीओ बनवून किंवा सोशल मीडियावर टाकण्यासाठी रिल्स बनवतात आणि यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. 80 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या वाहनांना अनेकदा अशा कृत्यामुळे अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता बळावते. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावर असे कृत्य करणाऱ्या वाहन चालकांची दखल वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावर थांबून फोटो किंवा व्हिडीओ शूट कराल तर कलम 341 नुसार, एक महिना कारावास किंवा पाचशे रुपये दंड तसेच कलम 283 नुसार, सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही व्यक्तीला धोका किंवा इजा होईल, असं कृत्य केल्यास दोनशे रुपये दंड ठोठावण्याची कारवाई आता वाहतूक पोलिस करणार आहेत.

दरम्यान, समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून या महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. हजारावर अपघात होऊनही आणि अनेकांचा जीव जाऊनही प्रशासनानं कठोर पावलं उचललेली नव्हती. पण आता प्रशासन सतर्क झाले असून नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे.

समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…

समृद्धी महामार्गावर मृत्यूमुखी पडलेल्या २५ प्रवाशांना श्रद्धांजली; गुन्हा दाखल…

समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!