दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् वहिनीचे आणखी…

चंदीगड (हरियाणा) : दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध होते. पण, वहिनीचे दुसरीकडे अनैतिक संबंध सुरू झाल्याचा संशय दिराला आल्यामुळे त्याने वहिनीची हत्या केल्याची धक्कादायक घटना भिवानी जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिगडाणा गावातील युवकाचे त्याच्याच वहिनीसोबत गेल्या चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते. महिलेच्या नवऱ्याला याबाबात काहीच माहित नव्हते. पण, वहिनीचे दुसऱ्या एका व्यक्तीसोबतही अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर दीर दीपक संतापला होता. दिपकला आपल्या वहिनीसोबत लग्न करायचे होते. पण, वहिनीचे आणखी एका व्यक्तीसोबत संबंध असल्याचे समजल्यानंतर दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. दिपकने वहिनीला असे न करण्याचा सल्लाही दिला, मात्र तिने ऐकले नाही. या वादातूनच दीपकने वहिनीची हत्या केली. याप्रकरणी महिलेच्या पतीने चुलत भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

भिवानीचे पोलिस अधीक्षक वरुण सिंगला यांनी सांगितले की, ‘मृत महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर तिगराणा येथील रहिवासी दीपक उर्फ ​​छोटू याला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान त्याने सांगितले की, त्याचे त्याच्या वहिनीसोबत चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. आपल्या वहिनीचे दुसऱ्यावर प्रेम आहे, असे वाटल्याने त्यांच्यात भांडण झाले आणि या भांडणातूनच त्याने वहिनीचा गळा चिरून हत्या केली. पुढील तपास करत आहोत.’

वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…

अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…

बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…

माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…

सुनेला भेटण्यासाठी तिचा प्रियकर उघडपणे घरी येतो अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!