
‘देवमाणूस’ फेम अभिनेत्याच्या भावाने केली आत्महत्या…
मुंबईः ‘देवमाणूस’ या मालिकेच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला अभिनेता एकनाथ गीते याच्या विजू या धाकट्या भावाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे गीते याच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
अभिनेता एकनाथ गीते याने भावाच्या मृत्यूनंतर भावूक करणारी पोस्ट शेअर केली आहे. इतकंच नाही तर हा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी माझ्याशी का बोलला नाहीस, असे म्हणत त्याने खंतही व्यक्त केली आहे.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘एक आठवडा झाला तुला जाऊन आज अजूनही खरं वाटत नाहीये…हे वाईट स्वप्न संपून जाग का येत नाहीये मला? असंच वाटतंय सतत…आयुष्यभराची हुरहूर लावून गेलास रे मनाला. खूप सारे प्रश्न सोडून गेलास, कुठे शोधू मी उत्तरं? आणि उत्तरं मिळाली, तरी तू नाहीस न दिसणार परत कधीच, कुठेच….. फक्त भाऊ नव्हतो ना आपण मित्र पण होतो ना रे. का नाही व्यक्त झालास माझ्याजवळ यावेळेस? आत्महत्या पर्याय कसा असू शकतो रे विजु? कसं जगायचं आम्ही आता तुझ्याशिवाय बाळा ???’
View this post on Instagram
दरम्यान, एकनाथ गीते हा मुळचा परभणीचा असून जिंतूर तालुक्यातील पिंपरी खुर्द हे त्याचे गाव आहे. अभिनयाचं शिक्षण घेण्यासाठी त्याने परभणीहून मुंबई गाठली. मुंबई युनिव्हर्सिटीमधून त्याने मास्टर्स ऑफ थिएटर आर्टस् केले. विशेष म्हणजे अल्पावधील तो लोकप्रिय झाला. एकनाथने देवमाणूस, हृदयी प्रीत जागते, गेट टू गेदर, घेतला वसा टाकू नको, अशा गाजलेल्या मालिका, चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.
अभिनेत्री जया प्रदा यांच्या अटकेसाठी पोलिसांचे छापे…
अभिनेता अजय देवगण अपघातात जखमी…
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे बंधू अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे निधन…
अभिनेत्रीचा आढळला मृतदेह; प्रेमसंबंधातून आत्महत्या…
प्रसिद्ध अभिनेत्रीची घरात गळफास घेऊन आत्महत्या…

