
पुणे शहरात चोरट्यांनी केला पोलिस अधिकाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न; स्वसंरक्षणार्थ गोळीबार…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरात रात्र गस्त पथकातील पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर भरधाव कार घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वसरंक्षणार्थ पोलिस अधिकाऱ्याने एक राउंड फायर केला. कात्रजच्या वंडरसिटी परिसरात शनिवारी (दि.२१) मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे.
भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक रतिकांत चंद्रशा कोळी (वय ३०, रा. स्वारगेट) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चार अज्ञात व्यक्तीं विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
पोलिसांनी दिलेल्या ही माहितीनुसार, रतीकांत कोळी शनिवारी रात्री कर्तव्यावर असताना पथकासोबत कात्रज परिसरात गस्त घालत होते. त्यांना वंडरसिटीजवळ एका कारसह चार संशयित व्यक्ती निदर्शनास आले, त्यांनी पथकाची गाडी कारला आडवी घातली आणि ते कारजवळ जाऊ लागले. त्याच क्षणी सशस्त्र चोरटे कारमध्ये बसले आणि कार रिव्हर्स घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. कारला थांबवण्यासाठी कोळीही कारच्या दिशेने पळू लागले. यांनतर कार चालकाने अचानक गाडी कोळी यांच्या दिशेने भरधाव दामटली. गाडी अंगावर येत असल्याचे दिसताच कोळी यांनी स्वसंरक्षणार्थ सर्व्हिस पिस्तूलमधून कारच्या मागच्या चाकावर गोळी फायर केली. यानंतर कारचालक नवले ब्रीजच्या दिशेने घेऊन पळून गेले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात पीएमटी बसचालकाला पोलिसाने केली मारहाण; कारण…
ड्रिंक ऍण्ड ड्राईव्ह! पुणे शहरात राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाने दोघांना उडवले…
ड्रिंक अँड ड्राइव्ह करणाऱ्यांना पुणे पोलिसांचा इशारा; थेट लायसन्स होणार रद्द…
पुणे शहरात गाडी अडवली म्हणून दोघांची पोलिसाला जबर मारहाण…
हिट ॲण्ड रन! पुणे शहरात कारने पोलिकाकाला चिरडले…
पुणे शहरात महिला पोलिसाला जिंवत जाळण्याचा प्रयत्न; आरोपीला कोठडी अन्….
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

