सांगली जिल्ह्यात टोळक्याने केली मध्यरात्रीच्या सुमारास पहिलवानाची निर्घृण हत्या…

सांगली : सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील कार्वे गावात एका पहिलवानाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आरोपी टोळक्याने गुरुवारी (ता. १६) मध्यरात्री विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर पहिलवानाला गाठून त्याची हत्या केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

राहुल गणपती जाधव (वय ३५) असे हत्या झालेल्या पहिलवानाचे नाव आहे. गुरुवारी मध्यरात्री जुन्या भांडणाच्या रागातून त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. राहुल जाधव हे कार्वे येथील स्मशानभूमी जवळ असलेल्या विटा तासगाव रस्त्यावरील पुलावर गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास होते. यावेळी अचानक याठिकाणी हल्लेखोरांचे टोळके आलं. त्यांनी गुप्ती आणि तलवारीच्या सहाय्याने राहुलवर सपासप वार केले. शिवाय, हॉकी स्टीकने मारहाण करत पहिलवान राहुल जाधव याची निर्घृण हत्या केली आहे.

माणिक संभाजी परीट, गजानान गोपीनाथ शिंदे, अमृत शहाजी माळी, नयन रंगलाल धाबी, प्रफुल्ल कांबळे, रोहन रघुनाथ जाधव आणि नितीन पांडुरंग जाधव यांनी हा हल्ला केल्याचा आरोप राहुल जाधव यांच्या भावाने केला आहे. यातील माणिक परीट, गजानन शिंदे आणि नयन धाबी या तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पहिलवान राहुल जाधव आणि संशयित आरोपी यांच्यात जुना वाद आहे. याच वादातून संशयितांनी राहुल जाधव यांच्या चारचाकीच्या काचा फोडल्या. तलवारीने डोक्यात वार करुन खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी विपुल पाटील आणि पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे हे पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सर्व संशयितांवर गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. जे. येळेकर करीत आहेत.

पोलिसकाकाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या…

धक्कादायक! मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असतानाच आई-वडिलांची आत्महत्या…

वाघोलीत मुली सोबत बोलतो म्हणून अल्पवयीन मुलाची केली हत्या…

नवी मुंबईतील दोघांची राहत्या घरातील हत्या समलैंगिक संबंधातून…

हृदयद्रावक! सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा अपघातात जागीच मृत्यू; पाहा नावे…

सांगलीत सिनेस्टाईल पद्धतीने नंग्या तलवारी नाचवल्या; युवकाची हत्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!