होळीची पोळी पोलिसांना दुसऱ्या दिवशी खावी लागते शिळी…

पुणे (संदिप कद्रे): देशभर होळी आणि धुलवडीचा सण मोठ्या उत्सवात सुरू आहे. नागरिक सण-समारंभ साजरे करत असताना दुसरीकडे मात्र पोलिसांना नागरिकांच्या संरक्षणासाठी घराबाहेर राहून ड्युटी करावी लागत आहे. यामुळे होळीची पोळी पोलिसांना दुसऱ्या दिवशी शिळी खायला मिळत आहे.

महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापनेपासून पोलिस नागरिकांच्या संरक्षणासाठी रात्रं-दिवस रस्त्यावर उभे आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन काळात हे प्रामुख्याने पाहायला मिळाले. लॉकडाऊन काळात पोलिस रात्रं-दिवस रस्त्यावर उभे होते. यावेळी नागरिकांचेही प्रेम पोलिसांना मिळाले. सण, समारंभ असो की कुटुंबातील वाढदिवस. पण, पोलिसांना आपले कर्तेव्य पार पाडावे लागते. पोलिस म्हटले की धावपळ आणि ताणतणाव आलाच. आपले कर्तेव्य पार पाडत असताना अनेक पोलिसकाकांना आपल्या शरिराकडेही पाहायला वेळ मिळत नाही. यामुळे अनेकांना विविध व्याधींना सामोरे जावे लागते.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याबरोबरच रात्रीची गस्त घालून पोलिस नागरिकांचे संरक्षण करत आहेत. पोलिस सण-समारंभावेळी २४ तास ऑनड्यूटी पाहायला मिळत आहेत. प्रत्येक सणाला रात्री बारा वाजेपर्यंत ड्युटी तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी दहा ते संध्याकाळी उशिरापर्यंत थांबावे लागत आहे. दिवसभर ड्युटी करून सुद्धा संध्याकाळी उशिरापर्यंत बंदोबस्त तसेच होळीच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा बंदोबस्त. तसेच सर्व सणांमध्ये पोलिसांवर ताण-तनाव जास्त प्रमाणात येतो याची दखल शासनाने कधी घेतली का? व याच्यावर विचार सुद्धा होत नाही शेवटी ते सुद्धा माणसं आहेत.

नागरिक सण-समारंभ मोठ्या उत्साहात साजरा करतात पण पोलिसांचा कोणीही विचार करत नाही. जनतेने सुद्धा याचा विचार करावा. जर का आपण स्वतःहून शिस्त पाळली तर पोलिसांवरचा ताण-तणाव नक्कीच कमी होऊ शकतो व त्यांनाही सण साजरा करता येईल. पण, सध्या तरी पोलिसांना होळीची पोळी शिळीच खायला मिळताना दिसत आहे.

अजित पवार यांचा पुणे पोलिसांना कडक इशारा; जमत नसेल तर…

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!