धक्कादायक! तान्हुल्या बाळासमोरच सासरा, दिर आणि मामे भावाने केला बलात्कार अन्…
ठाणेः सासरा, दिर आणि मामे भावानेच महिलेवर आळीपाळीने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना टिटवाळा परिसरात घडली आहे. या घटनेतील मामे भाऊ अल्पवयीन आहे. या घटनेनंतर आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
ठाण्यातील टिटवाळा भागात सासरा, दिर आणि अल्पवयीन मामेभावाने महिलेला (वय २२) मारहाण केली असून, आळीपाळीने सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. सिव्हील हॉस्पिटलमधून पोलिसांना घटना घडल्याचे कळले असल्याचे टिटवाळा कल्याण उपनिरिक्षक जगदीश शिंदे यांनी सांगितले आहे. टिटवाळा कल्याण ग्रामीण पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. याबाबत अधिक तपास सुरु असून आरोपी दिर सुनील काशिनाथ वाघे (वय 22), सासरा काशिनाथ वाघे (वय 50) व मामेभाऊ १६ वर्षीय असल्याचे समोर आले आहे.
टिटवाळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 6 सप्टेंबर रोजी घडली. विवाहीतेवर सामूहिक अत्याचारानंतर तिच्यावर कोयत्याने वार केले. यात पीडितेचा जबडा तुटला असून हात-पायही फॅक्चर झाले आहेत. अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत पीडीतेला ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेच्या जबाबावरून सासरा, दीर आणि एका अल्पवयीन तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे.
टिटवाळा जवळील एका गावात वीट भट्टीवर काम करणारे कातकरी दांपत्य त्यांच्या दोन मुलांसोबत झोपडी करून राहात होते. 6 सप्टेंबरला पीडितेचा नवरा कामानिमित्त जवळच असलेल्या पडघा येथे गेला होता. रात्र झाल्यानंतर पीडिता तिच्या दोन्ही मुलांसोबत झोपडीत होती. तितक्यात पीडितेचा सासरा, दीर आणि एक नातेवाईक जबरदस्ती झोपडीत शिरले. पीडितेला धमकावू लागले. पीडितेचा आठ वर्षीय मुलगा घाबरला आणि तो झोपडूनतून बाहेर पळाला. पीडिता तिच्या तान्हुल्या मुलांसोबत होती. तिन्ही नराधमांनी हीच संधी साधून तान्हुल्या बाळासमोरच पीडितेवर सामूहिक अत्याचार केला. शिवाय, तिघांनी तिच्यावर कोयत्याने वार केले. यात पीडितेचा जबडा तुटला असून तिचे हात-पायहीची फ्रॅक्चर झाले आहेत. या प्रकरणी कल्याण ग्रामीण पोलिस पुढील तपास करत आहेत.
वाशिम हादरलं! शेतात काम करणाऱ्या महिलेची हत्या; बलात्काराचा संशय…
भरदिवसा चौकात रस्त्याकडेलाच बलात्कार; Video Viral…
मोठी बातमी! बलात्काऱ्यांना 10 दिवसांत फाशी; विधानसभेत विधेयक मंजूर…
बलात्कार पीडितेचे नाव, फोटो शेअर केल्यास शिक्षा…
मुंबईत मैत्रीच्या ओळखीचा गैरफायदा! सामूहिक बलात्कार…