पुणे शहरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला गोळीबार…

पुणे : पुणे शहरातील वारजे येथील रामनगरमध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हवेत गोळीबार केला, या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी रात्री अंदाजे साडेदहाच्या सुमारास घडली आहे. आरोपी गोळीबार करून मुंबई -पुणे हाय वे वरून कात्रजच्या दिशेने पळून गेले. वारजे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान मंगळवारी पार पडलं. मतदान संपताच बारामती लोकसभा मतदारसंघात ही गोळीबाराची घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी वारजेमधील रामनगरमध्ये हवेत गोळीबार केला. त्यानंतर ते मुंबई -पुणे हाय वे वरून कात्रजच्या दिशेनं पळून गेले. दरम्यान आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वारजे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात गोळबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, मंगळवारी पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली. दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी वारजे परिसरात गोळीबार केला. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरले आहे, आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी चौथ्यांदा गोळीबार…

पुणे शहरात काडीपेटी मागितली म्हणून केला गोळीबार…

पुणे शहरात दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार…

पुणे जिल्ह्यात हॉटेलमध्ये बसलेल्या व्यक्तीवर तिघांकडून गोळीबार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!