पुणे हादरलं! पुणे शहरात फायनान्स कंपनीच्या व्यवस्थापकाची हत्या…

पुणे : पुणे शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची गोळ्या झाडल्यानंतर कोयत्याने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना रविवारी (ता. १) रात्री नाना पेठेत घडली. या घटनेनंतर काही वेळातच पुण्यातील हडपसर भागात एका फायनान्स कंपनीच्या मॅनेजरची हत्या करण्यात आली. वासुदेव कुलकर्णी असं हत्या झालेल्या व्यवस्थापकाचे नाव आहे.

वासुदेव कुलकर्णी हे एका फायनान्स कंपनीत मॅनेजर म्हणून काम करत होते. रविवारी (ता. १) रात्री घरासमोरच वासुदेव कुलकर्णी हे शतपावली करत होते. त्यावेळी अज्ञातांनी त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. वासुदेव कुलकर्णी हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला आहे. वासुदेव कुलकर्णी यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे हडपसरसह पुण्यात पुन्हा एकदा भितीचं वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, वासुदेव कुलकर्णी यांच्या खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: पुणे शहरात पुन्हा गोळीबार; माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा मृत्यू…

पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….

पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दारुड्याने केला फोन अन् एकच धावपळ…

पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…

Video: पुणे शहरातील जखमी पोलिस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा; पाहा आरोपींची अवस्था…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!