
पुणे शहरातील नदी पात्रात सापडलेल्या खुनाचे रहस्य उलगडलं….
पुणे: पुणे शहरातील मुळा-मुठा नदी पात्रात सापडलेल्या महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. शिवाजीनगर परिसरातील झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून सकिना खान या महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे या मागचा खरा सूत्रधार तिचा सख्खा भाऊ निघाला आहे.
सकिना हिचा सख्खा भाऊ आणि वहिनीने सकीना हिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट होतील या उद्देशाने तिचे तुकडे करून ते नदीत फेकून दिले. सकीना ज्या भागात राहत होती तिच्या शेजाऱ्यांना ती कुठे गायब झाली आहे याचा संशय आला आणि त्यांनी पोलिसात तक्रार दिल्यावर हा सगळा प्रकार उघडकीस आला.
पुणे शहरातील गेल्या काही दिवसांपुर्वी मुळा-मुठा नदी पात्रात सापडलेल्या मृतदेहाच आज अखेर उलगडा झाला आहे. 26 ऑगस्ट रोजी मुळा-मुठा नदी पात्रात सापडलेल्या शिर नसलेल्या मृतदेहाचा तपास पुणे पोलिसांनी जवळपास पूर्ण केला आहे. सकीना खान नावाच्या महिलाचा हा मृतदेह होता, तिची अशी निर्घृण हत्या तिच्या सख्ख्या भावाने आणि वहिनीने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मृत सकीना खान पुण्यातील पाटील इस्टेट भागातील एका खोलीत राहत होत्या. ती खोली सकीना खान यांच्या नावावर होती. ती खोली त्यांनी सोडून जावे, असे त्यांचा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांना वाटतं होते. यावरून त्यांच्यात अनेकदा वाद होत होते. या कारणामुळे दोघांनी मिळून सकीना खान यांची हत्या केली आणि घरातच धारदार शस्त्राने मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्या तुकड्यांना भर पावसात मुठा नदीत फेकण्यात आले होते.
दरम्यान, हत्या केल्यानंतर भावाने आणि वहिनीने सकीना खान गावाला गेल्याची खोटी माहिती शेजार्यांना दिली होती. त्यावेळी शेजार्यांनी सकीना खानच्या गायब होण्याबद्दल संशय व्यक्त केला आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्वरित कारवाई करून तपास सुरू केला. पोलिसांनी तपास करून अशपाक खान आणि हमीदा यांना अटक केली आहे. त्यांनी हत्या केलेल्या खोलीतून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास केला आणि हे गूढ उकलले. या प्रकरणात पुणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी झाली असून, त्यांनी हत्येचं गुढं उकलले आहे. सकीना यांची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे केले, पुण्यात जोरदार पाऊस पडत होता. यामुळे हत्या करून मृतदेह नदीत फेकले होते. पण, पोलिसांनी गुन्ह्याचा शोध लावला आहे.
Video: पुणे शहरातील जखमी पोलिस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा; पाहा आरोपींची अवस्था…
पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दारुड्याने केला फोन अन् एकच धावपळ…
पुणे हादरलं! आईच्या प्रियकराचे अल्पवयीन मुलीसोबत संतापजनक कृत्य…
पुणे जिल्हा हादरला! बापानेच केला स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार…
Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…

