
आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल…
पुणे: आळंदी येथील केळगाव रस्त्यावर असलेल्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत युवतीवर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेने पाच जणांविरुद्ध बलात्कार, अपहरण, धमकी आणि जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शेवगाव पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. तसेच सखल मराठा समाजाकडून आळंदी पोलिस ठाण्यात पत्र देत कडक कारवाईची मागणी केली आहे.
पुणे गणपती मंडळांसाठी स्वतंत्र पुरवणी आणि ई-पेपरची सुविधा!
पीडित युवती 2 जून 2025 रोजी घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या एका महिलेने तिला शेताकडे जाण्याचे कारण सांगून घराबाहेर नेले. त्याचवेळी वाटेत काळ्या रंगाच्या इर्टिगा गाडीतून आलेल्या आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे आणि एका अनोळखी चालकाने तिचे जबरदस्तीने अपहरण केले. तिने आरडाओरड केली असता अॅसिड टाकण्याची धमकी देण्यात आली. नंतर तिला आळंदी येथील खासगी मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत नेण्यात आले. तिथे आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, कीर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यु आंधळे यांनी तिला खोलीत डांबून ठेवले. या ठिकाणी आण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
पोलिसांनी आण्णासाहेब प्रल्हाद आंधळे, प्रविण प्रल्हाद आंधळे, अनोळखी वाहनचालक, सुनिता अभिमन्यु आंधळे आणि अभिमन्यु भगवान आंधळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपींवर अपहरण, बलात्कार, धमकी देणे, जबरदस्ती आणि गुन्हेगारी कट रचण्याच्या गंभीर आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
टेनिसपटू राधिका यादव हत्याकांडात धक्कादायक खुलासे समोर…
फेसबुकवरील महिलेच्या मैत्रीमुळे गेला अधिकाऱ्याचा जीव…
मुंबई! विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…
पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…
पुणे! मैत्रिणीला दिवस गेल्याचे कळल्यानंतर रबडीतून दिली गोळी अन् अनेकींसोबत संबंध…

