पुणे शहरात युवकाचा तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून…

पुणे: पुणे शहरातील वडगाव शेरी परिसरात युवकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना बुधवारी (ता. १) रात्री घडली. वैमनस्यातून युवकाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त वर्तविली असून, चंदननगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

अभिषेक राठोड (वय ३१) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिषेक बुधवारी रात्री वडगाव शेरीतील ब्रम्हा सनसिटी सोसायटीत परिसरातून निघाला होता. त्यावेळी हल्लेखोरांनी त्याला अडवले. राठोड याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.

राठोडला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. राठोड याचा खून वैमनस्यातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.

डेटींग ऍपद्वारे ग्राहकांना आकर्षीत करणारी जोडी सामाजिक सुरक्षा विभागाच्या ताब्यात…

पुणे शहरात चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीची गळा चिरुन हत्या; चिमुलकली पोरकी…

मित्राने धमकी देत लहानपणीच्या मैत्रीणीवर केला बलात्कार…

पुणे शहरात पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण…

प्रेमसंबंधात अडथळा! पुणे शहरात वेबसिरिज पाहून केला खून अन् मृतदेह…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!