मुलगा स्वप्नात येऊन विचारायचा; आई तू मला का मारले? अन् पुढे…
भोपाळ (मध्य प्रदेश): एका महिलेचे शेजारील व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. दोघांना नको त्या अवस्थेत तिन वर्षाच्या चिमुकल्याने पाहिल्यामुळे तिने मुलाला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून खून केल्याची धक्कादायक घटना ग्वालेर येथे घडली होती.
एका पोलिसाने २८ एप्रिल रोजी दुकानाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम होता. त्यावेळी त्याच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबालाही आमंत्रित केले होते. त्यावेळी हेड कॉन्स्टेबलची पत्नी आणि शेजारी राहणारा व्यक्ती दोघेही सर्वांची नजर चुकवत छतावर गेले होते. त्याठिकाणी दोघेही रोमान्स करत होते. तेव्हा महिलेचा ३ वर्षाचा मुलगा तिथे पोहचला. महिलेने मुलाला पाहिले आणि ती घाबरली. मुलगा आपले कृत्य वडिलांना सांगेल या भीतीने आईने स्वत:च्या पोटच्या मुलालाच छतावर खाली ढकलून दिले.
चिमुकला छतावरून खाली पडल्याने त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. एक दिवस त्याच्यावर रुग्णालयात उपचार झाले. परंतु तो वाचू शकला नाही. या मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली. मुलाचा अपघाती मृत्यू असल्याचे सर्वांना वाटले. दरम्यान, या घटनेच्या ४ महिन्यानंतर महिलेला स्वप्न पडू लागली. त्या भीतीदायक स्वप्नात तिला तिचा मृत मुलगा दिसू लागला. तू मला का मारले? असा प्रश्न मुलगा स्वप्नात येऊन विचारत होता. अखेर महिलेने तिचा गुन्हा पतीसमोर कबुल केला.
दरम्यान, पत्नीकडून पतीला जे काही सांगण्यात आले त्याने त्याला धक्का बसला. त्यानंतर पतीने महिलेचं पूर्ण कथन व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्यानंतर महिला पोलिसांकडे स्वाधीन झाली. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
माता न तू वैरिणी! आईने चिमुकलीच्या नाकाला चिमटा लावला अन्…
दिशा भोईटे हिच्या मृत्यूबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन; चौकशीची मागणी…
नवऱ्याच्या अनैतिक संबंधावरून कार्यालयातच चपलेने धुलाई…
अनैतिक संबंध! पोलिसकाकाचे पीएसआय व्हायचे स्वप्न राहिले स्वप्नच…
माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…