नवऱ्याच्या अनैतिक संबंधावरून कार्यालयातच चपलेने धुलाई…
पाटणा (बिहार): नवऱ्याच्या अनैतिक संबंधांवरुन पत्नी थेट नवऱ्याच्या ऑफिसमध्येच पोहोचली आणि त्याला चपलेने मारहाण केली. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बिहारच्या औरंगाबादमध्ये ही घटना घडली आहे.
पती इंजिनिअर असून नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात बसून काम करत होता. यावेळी एक महिला कार्यालयात आली आणि चप्पल हातात घेऊन अधिकाऱ्याला मारहाण करु लागली. यावेळी कार्यालयातील सर्वजण आश्चर्याने पाहत उभे राहिले. सुरुवातीला संबंधित महिला कोण आहे? आणि ती मारहाण का करत आहे? हे कळत नाही. पण नंतर ही महिला अधिकाऱ्याची पत्नी असल्याचे सर्वांना समजले.
व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘महिला पतीच्या कार्यालयात शिरल्यानंतर त्याला चपलीने मारहाण करण्यास सुरुवात करते. यावेळी पती मारहाणीपासून वाचण्याचा प्रयत्न करतो. पती तिच्यापासून बचाव करत बाहेर पळत गेला असता, पत्नी तिथेही त्याचा पाठलाग करते. रस्त्यावर गेल्यानंतरही महिला पतीला मारहाण करत राहते. यादरम्यान, ती पती आपल्याला आर्थिक मदत पुरवत नसल्याचा आरोप करते. महिला पतीला मारहाण करत असताना नागरिकांची गर्दी जमा होते.’
मारहाण केल्यानंतर महिलेने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘आपण गेल्या एक वर्षापासून माहेरी आई-वडिलांकडे राहत आहोत. पण आपला पती ना आपल्याला आर्थिक मदत करत आहे, ना आपल्या मुलांना कोणती मदत देत आहे. पैसा मिळत नसल्याने मुलांना चांगलं शिक्षण मिळत नाही. आपला पती सर्व पैसा विवाहबाह्य संबंधावर खर्च करत आहे. यामुळे मला आणि मुलांना कोणतेही आर्थिक सहाय्य मिळत नाही आहे. या जोडप्याची मुलगीही आईसह पोहोचली होती. तिनेही वडिलांवर आरोप केले आहेत. वडिलांचे विवाहबाह्य संबंध केले असून, गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. पतीचे कार्यालयातील एका महिला अधिकाऱ्याशी प्रेमसंबंध आहेत. पती कार्यकारी अभियंता म्हणून काम करतो.’
प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर गावकऱ्यांचा चढला पारा अन्…
Video: नवऱ्याला दुसऱ्या महिलेसोबत हॉटेलमध्ये रंगेहात पकडलं अन् पुढे…
संतापजनक Video! पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले अन् पुढे…
नवऱ्याचे दुसरं लग्न सुरू असतानाच पत्नी मुलाला घेऊन पोहोचली लग्न मंडपात अन्…
लॉजवर मैत्रिणीसोबत असताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने युवकाचा मृत्यू…
प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…