
मेव्हणी आणि दाजीचे प्रेमसंबंध अन् महिन्यातच नवऱ्याचा खून…
पाटणा (बिहार) : बहिणीचा नवरा म्हणजे दाजीवर एका युवतीचे प्रेम होते. पण, घरच्यांनी महिन्यापूर्वी दुसऱ्या युवकासोबत लग्न लावून दिल्यानंतर मेव्हणीने दाजीसोबत मिळून आपल्याच पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मोतिहारी येथे घडली आहे.
पतीच्या हत्येनंतर महिलेने मृतदेह बागेत लपवला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पत्नीला अटक केली आहे. प्रियकर दाजी अद्याप फरार आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. एक महिन्यातच युवकाचा खून झाल्यामुळे कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पतीच्या हत्येमागे पत्नीचे तिच्याच दाजीसोबत असलेले प्रेमसंबंध होते. तिचा नवरा त्यांच्या प्रेमात अडथळा ठरत होता. त्याला दोघांच्या प्रेमप्रकरणाबद्दल समजले होते. पतीने पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नी आणि दाजी या दोघांनी कट रचून त्याची हत्या केली. पोलिसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेऊन तिची चौकशी केल्यानंतर हत्येचा उलगडा झाला.
सिरहा गावातील ही घटना आहे. राजेश या युवकाचे महिन्याभरापूर्वी प्रियंकासोबत लग्न झाले होते. राजेशला पत्नीच्या वागण्याबाबत संशय आला. प्रियांका फोनवर सतत बोलायची. चौकशी केल्यावर प्रियंका तिचा दाजी शंभू प्रसाद यांचे प्रेमसंबंध असल्याची माहिती राजेशला समजली. राजेशने प्रियांकाला समजावून सांगून शंभू प्रसाद याच्याशी संपर्क तोडण्यास सांगितले. पण, तिने आपल्या पतीचे ऐकले नाही आणि ती आपल्या दाजीसोबत सतत संपर्कात राहिली. पती वारंवार वाद करत असल्याने संतापलेल्या प्रियकांने प्रियकर दाजीकडे याबबात तक्रार केली. दाजी रागाने प्रियांकाच्या घरी पोहोचला आणि त्याने राजेशला धमकी दिली की प्रियंकावर ओरडणं थांबव अन्यथा परिणाम वाईट होतील, असा दबाव टाकला. त्यानंतर दोघांनी मिळून 30 एप्रिल रोजी राजेशची हत्या केली.
छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार…
जावयाने तोडले सासूचे नाक अन् पुढे…
पुणे जिल्ह्यात लग्नाच्या दिवशीच नवरदेवाची आत्महत्या; कारण सांगितले…
हृदयद्रावक! लग्न करायला निघालेल्या प्रेमीयुगुलाचा वाटेतच अंत…
धक्कादायक! लग्नानंतर 7व्या दिवशी प्रियकरासह पळाली नवरी; जाण्यापूर्वी..
राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…

