विकृती! पुणे शहरात पत्नीच्या गुप्तांगावर लावलं कुलूप अन् दोन दिवस चावीचा शोध…

पुणेः पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत नवऱ्याने पत्नीला आधी बेदम मारहाण केली, त्यानंतर गुप्तांगाला कुलूप लावल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमधील वाकड येथे उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. वाकड पोलिस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे गुप्तांगाला लावलेल्या कुलुपाची चावी दोन दिवस न मिळाल्यामुळे डॉक्टरांनी हे कुलुप कापून काढले आणि महिलेची वेदनेपासून सुटका केली.

वाकडमध्ये राहणारे हे दाम्पत्य मूळचे नेपाळमधील आहे. उपेंद्र हुडके (वय ३०, मुळ रा. बाचकुट, नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नेपाळमधील हुडके दाम्पत्य कामानिमित्त पुण्यात वास्तव्यास आहे. पण पती नेहमीच पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यांच्यामध्ये वारंवार या कारणामुळे भांडणं होत होती. 11 मे 2024 रोजी पती-पत्नीमध्ये रात्री दहा वाजता वाद झाला. रागाच्या भरात उपेंद्र याने पत्नीला (वय २८) बेदम मारहाण केली. त्यानंतर ब्लेडने लघवीच्या जागी जखम केली. निर्दयीपणे त्याने गुप्तांगाच्या दोन्ही बाजूला छिद्र पाडले आणि पितळेचे कुलुप लावून फरार झाला. पतीच्या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली होती. पीडित महिलेवर वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वाकड पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडितेचा जबाब नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबधित पती विरुद्ध भादवी 326,506 आणि 323 नुसार गुन्हे दाखल करत त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी उपेंद्र हुडके याला बेड्या ठोकल्या पण कुलुपाची चावी मिळाली नाही. दोन दिवस पीडित महिलेच्या गुप्तांगावर लावलेले पितळी कुलूप चावी नसल्याने डॉक्टरांना काढता येत नव्हते. त्यामुळे पीडित महिला अतीव वेदनेने अजूनही विव्हळत होती. संबंधित प्रकरणातील पीडित महिलेच्या गुप्तांगावरील कुलपाच्या कड्या कापून ते काढण्यात आले असून पीडित महिलेवर उपचार करण्यात आले आहेत आणि तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. जखमी महिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणानंतर पुण्यामध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पोलिस दलात काम करत असताना आपल्या संपूर्ण कारकिर्दीत एवढा विकृत गुन्हेगार कधीही पाहिला नसल्याचे सांगत पोलिसांनी देखील या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. तर या प्रकरणाचा पूर्ण तपास करून दोषी आढळणाऱ्या प्रत्येकाला कठोरात कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सहायक पोलिस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांनी सांगितले आहे.

विकृती! रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या वेटरचे संतापजनक कृत्य…

संतापजनक Video: आईस्क्रीमवाला हस्तमैथुन करून ग्लासमध्ये टाकत होता वीर्य…

विकृती! मादी श्वानाशी अनैसर्गिक सेक्स करताना एकाने पाहिले अन्…

क्ररता! युवतीचे फेविक्विकने चिटकवले ओठ; जखमेवर मिरची पावडर…

स्पॅनिश महिलेने सांगितली सामूहिक बलात्काराची थरारक घटना…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!