Google Maps मुळे पत्नी सापडली पण नको त्या अपस्थेत…

पेरू: माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या आहेत. पण, तत्रज्ञानाचे जेवढे फायदे आहेत, तेवढेच तोटेही आहेत. एका प्रकरणात पतीला Google Maps मुळे पत्नी सापडली पण प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत. यामुळे त्याने पत्नीला घटस्फोट दिला आहे.

पूर्वी एखाद्या ठिकाणी जायचं असल्यास त्या ठिकाणाचा पत्ता शोधताना अनेक अडचणी येत होत्या. पण आता गुगल मॅपमुळे कोणत्याही ठिकाणी पोहचणे सोपे झाले आहे. प्रवास करताना लोकेशन समजण्यासाठी अनेकजण जण गुगल मॅपचा वापर करतात. गुगल मॅपमुळे रस्ते शोधणं सोप झाले आहे. पण गुगल मॅपमुळे पेरुची राजधानी लीमा येथील एका जोडप्याचा घटस्फोट झाला आहे.

एका व्यक्तीची पत्नी कामानिमित्ताने बाहेर गेली होती. पत्नी बराचवेळ न परतल्याने त्याने पत्नीचे लोकेशन तपासले. गुगल मॅपमध्ये रस्त्यांचे काही फोटो झूम इन करून त्याने पाहिले. यावेळी त्याला पत्नी दिसली पण नको त्या अवस्थेत. संबंधित दृष्य पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. रस्त्याशेजारी असलेल्या एका बेंचवर त्याची पत्नी परपुरुषासोबत इंटिमेट होताना त्याने पाहिलं. पत्नीचे हे फोटो त्याने गुगल मॅपद्वारे पाहिले होते. या घटनेनंतर पतीने घटस्फोट घेतला आहे.

पत्नी रस्त्याच्या कडेला एका बेंचवर बसली होती. बेंचवर एक पुरुष झोपला होता, आणि त्याचे डोके तिच्या मांडीवर होते. ती त्याच्या डोक्यातून प्रेमाने हात फिरवत होती. गुगल कॅमेऱ्याने हा फोटो क्लिक केला. संशय आल्याने पतीने हा फोटो झूम करुन पहिला त्यावेळी त्या महिलेने घातलेल्या कपड्यांवरुन ती आपलीच पत्नी असल्याचे त्याने ओळखले.

फोटो पाहिल्यानंतर त्याने पत्नीला याचा जाब विचारला, पत्नीनेही आपले प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली. यामुळे संतापलेल्या पतीने तीला न्यायालयात खेचले. दोघांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पार्टनरला किती दिवस धोका देऊ शकता, कधी ना कधी याचा पर्दाफाश होणारच, अशा प्रतिक्रिया अनेकांनी नोंदवल्या आहेत.

प्रेमी युगुलाने आत्महत्येसाठी निवडली हॉटेलमधील रूम नंबर 305ची खोली…

मला माझीच लाज वाटते; गुड बाय साकिब; माझं तुझ्यावर प्रेम आहे…

संतापजनक! नवऱ्याने घेतली बायकोची ‘अग्निपरीक्षा’, प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली चटणी अन्…

‘प्रेम करताना जात धर्म बघू नका,’ असे स्टेटस ठेवत प्रेमीयुगलाची आत्महत्या…

प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!