प्रेम! वहिनीने दिरासोबत काढला पळ अन् पुढे…

जयपूर (राजस्थान): एक विवाहित महिला पाच वर्षांनी लहान असलेल्या मावस दिरासोबत पळून गेल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

महिलेला दोन मुलंही आहेत. ती आपल्या दीरोबरोबर (वय २३) पळून गेल्याचे तिच्या भावाला कळताच त्याने त्या दोघांना शोधले आणि दोघांना बेदम मारहाण केली. मावस भावाची प्रकृती गंभीर असून, त्याला अलवरच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. युवकाला मारहाण करणाऱ्या सात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

अलवरमधल्या गोविंदगड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या ईदपूर गावात ही घटना घडली आहे. संबंधित महिला आपल्या पतीच्या मावसभावासोबत पळून गेली. आपली बहीण हरवली असल्याची तक्रार महिलेच्या भावाने गोविंदगड पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यानंतर ती महिला आणि प्रियकर बलवंत सिंह याला नातेवाईकांनी एमआयए पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात पकडले आणि बेदम मारहाण केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेच्या भावाने 13 जुलै रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तिचा भाऊ आणि अन्य नातेवाईकांनीही त्या दोघांचा शोध सुरू केला होता. अलवरच्याच एमआयए ठाण्याच्या क्षेत्रात त्यांना ते दोघंही एकत्र सापडले. दोघांनाही बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांना याची माहिती मिळाली, तेव्हा गोविंदगड पोलिस ठाण्याचे पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी झालेल्या युवकाला गोविंदगडच्या आरोग्य केंद्रात नेले. युवकाला मारहाण करणाऱ्या सात जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वहिनीच्या खोलीत मध्यरात्री घुसताना एकाला दिराने पाहिले अन्…

दीर-वहिनीचे प्रेमसंबंध अन् मृत्यूनंतरही चार महिने ‘एक दुजे के लिए’…

वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध अन् जीव गेला नवऱ्याचा…

दीर आणि वहिनी झाडाखाली थांबले-थांबले अन् पुढे…

दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर…

दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!