काँग्रेस नेत्याची भररस्त्यात गोळ्या घालून निर्घृण हत्या…
जयपूर (राजस्थान): काँग्रेस नेते मेहताब सिंह गुर्जर यांची भर रस्त्यात गोळ्या घालून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ ते ७ जणांनी बेछूट गोळीबार केला आणि बाजारातून ते पळून गेले. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा तपास सुरू केला आहे.
काँग्रेस नेते मेहताब सिंह गुर्जर यांची हल्लेखोरांनी हत्या केल्यानंतर हवेत गोळीबारही केला. त्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी नाकाबंदी केली. मात्र हल्लेखोर निसटण्यात यशस्वी ठरले. हत्येच्या घटनेने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मानिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांगरोळ गावात राहणारे काँग्रेस नेते मेहताब सिंह गुर्जर हे बाजारात आले होते. यावेळी सहा हून अधिक जणांनी भर बाजारात मेहताब यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यात मेहताब यांना ८ गोळ्या डोक्यात, छातीवर आणि पोटात लागल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
धौलपूर पोलिसांनी सांगितले की, ‘पोलीस सीसीटीव्ही फूटेज आणि व्हिडीओच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे. जुन्या वादातून ही हत्या झाली असण्याची शक्यता आहे. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी साहित्य खरेदी करायला मेहताब हे बाजारात आले होते. पुढील तपास सुरू आहे.’
उद्धव ठाकरे यांच्या खंद्या शिलेदाराने रुळावर झोपून संपवलं आयुष्य…
एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची पोलिस कोठडीत आत्महत्या…
शिक्षकाने ब्लॅकमेल करत असल्याचे स्टेटस ठेवून केली आत्महत्या…
धक्कादायक! प्रेमसंबंधातून नवऱ्यासह तीन मुलांची हत्या…
सना खान यांच्या हत्या प्रकरणात हाय व्होल्टेज ड्रामा…