पुणे शहरात गाडी अडवली म्हणून दोघांची पोलिसाला जबर मारहाण…
पुणे : सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी फाटा येथे पोलिसांनी भरधाव वेगाने येणारी कार थांबवण्यास सांगितल्याने थेट पोलिसांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना सिंहगड रोडवर घडली आहे. गाडी अडवल्याच्या रागातून नोकरी कशी करतो ते बघतोच अशा शब्दात धमकीसुद्धा देण्यात आली. या प्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगेश शिवाजी फडके व बापू रोहिदास दळवी यांच्या विरोधात हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिंहगड रस्ता परिसरातील कोल्हेवाडी शिवनगर रस्ता याठिकाणी वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडी हटविण्यासाठी पोलिस अंमलदार ऋषिकेश गायकवाड व आर. सी. फडतरे हे नेमणूकीस होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एक कार भरधाव वेगाने येत असल्याचे पाहून पोलिस अंमलदार गायकवाड यांनी ती कार थांबवून रस्त्याच्या बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी कारचालक मंगेश फडके याने अरेरावी सुरू केली व कार बाजूला घेण्यास नकार दिला.
पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
मंगेश फडके हा कार तशीच रस्त्यावर उभी ठेऊन उतरला व ‘मी कोण आहे तुला माहित नाही. तू नोकरी कशी करतो तेच बघतो,’ असे म्हणत पोलिस अंमलदार ऋषिकेश गायकवाड यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. दुसरे पोलिस अंमलदार आर. सी. फडतरे हे गायकवाड यांच्या मदतीसाठी धावले. तेव्हा कारमध्ये बसलेला बापू रोहिदास दळवी हा कारमधून उतरला आणि त्यानेही पोलिसांना मारहाण केली. या प्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगेश शिवाजी फडके आणि बापू रोहिदास दळवी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 121 (1), 132, 351 (2), 351 (3), 352 नुसार हवेली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात महिला पोलिसाला जिंवत जाळण्याचा प्रयत्न; आरोपीला कोठडी अन्….
पोलिस भरती दरम्यान आणखी एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू…
पोलिसकाकाने घेतला जगाचा निरोप; कुटुंबियांना धक्का…
राज्यातील 68 पोलिस उप अधीक्षक, सहायक पोलिस आयुक्तांच्या बदल्या; पाहा यादी…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…