
पोलिसकाकाने गंभीर गुन्ह्यातील आरोपीला ठार करून घेतला शेवटचा श्वास…
श्रीनगर (जम्मू-काश्मीर): कठुआमध्ये 2 एप्रिल रोजी रात्री 10.35 च्या सुमारास पोलिस आणि गुंडामध्ये झालेल्या चकमकीत दोन पोलिस अधिकारी जखमी झाले होते. यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर चकमकीत एक गुंड ठार झाला आहे.
पोलिस प्रवक्त्याने सांगितले की, एका गुप्त माहितीवर कारवाई करत अधिकाऱ्यांच्या पथकाने कुख्यात गुन्हेगार वासुदेवचा पाठलाग केला आणि जीएमसीजवळ चकमक झाली. रामगढ पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या खुनाच्या गुन्ह्यात वासुदेव हा मुख्य आरोपी होता. या चकमकीत तो ठार झाला तर त्याचा एक साथीदार जखमी झाला. दीपक शर्मा यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे, तर पोलिस विशेष अधिकारी अनिल कुमार (40) यांनाही दुखापत झाली आहे. या दोघांना कठुआ येथील जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दीपक शर्मा यांचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा मृतदेह कठुआ येथील जीएमसी रुग्णालयात नेण्यात आला, तर चकमकीत गुंड वासुदेव ठार झाला असून तर त्याचा एक सहकारी जखमी झाला आहे.
पोलिस दल, स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचय?
जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी पीएसआय अधिकाऱ्याच्या बलिदानावर शोक व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, ‘कठुआ येथील मोस्ट वाँटेड गुंडाला शौर्याने लढताना आणि ठार मारताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पीएसआय दीपक शर्मा यांच्या शौर्याला आणि त्यांच्या धैर्याला मी सलाम करतो. त्यांचे सर्वोच्च बलिदान आपल्या हृदयात कायम राहील. शहीद दीपक शर्मा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. संपूर्ण देश शहीद कुटुंब आणि जम्मू-काश्मीर यांच्यासोबत एकजुटीने उभा आहे. त्यांचे समर्पण, विविध आव्हाने आणि संकटांशी लढण्याचे धैर्य आम्हाला सतत प्रेरणा देत आहे. आमच्या शहीदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेतला जाईल आणि आम्ही भयमुक्त जम्मू-काश्मीर निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहोत.’
काश्मीरमध्ये हुतात्मा झालेल्या जवानांची हृदयद्रावक कहानी…
Video: जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात 4 जवान हुतात्मा…
जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत कर्नल, मेजर, पोलीस अधिकारी आणि श्वान हुतात्मा…
जवान संदीप मोहिते अनंतात विलीन; काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…