समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू…

छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावरील हर्सूल सावंगी गावाजवळ कार आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जण जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. त्यापैकी दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर शहराजवळील हर्सूल सावंगी या ठिकाणी नागपूर कॉरिडॉर चैनल क्रमांक 436 जवळ अपघात झाला होता. अपघातात तीन जण गंभीर जखमी तर एक जण किरकोळ जखमी झाला होता. जखमींना छत्रपती संभाजी नगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

रितेश भाणादकर , संदीप साखरवाडे, स्वरूप रामटेके आणि आशिष सरवदे हे चौघेजण कारमधून मुंबई कडून नागपूरच्या दिशेने जात असताना कारचे नियंत्रण सुटल्याने ट्रकला पाठीमागून धडक दिली. चौघे जखमी भंडारा येथील रहिवासी आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

थरार! समृद्धी महामार्गावरून पोलिसांनी संशयास्पद ट्रकचा पाठलाग सुरू केला अन्…

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागली अन्…

साईबाबांचे दर्शनानंतर समृद्धी महामार्गावरून जाताना भीषण अपघात…

समृद्धी महामार्गावर काळाचा घाला; युवक ठार, तिघे गंभीर…

समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!