
सांगलीत भोंदूबाबाकडून लैंगिक अत्याचार; तू मागच्याजन्मी नागीन अन् हा नाग…
सांगली : तू मागच्या जन्मी नागीन होतीस, हा नाग होता. तुमच्या दोघांचे लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा जन्म झाला आहे, असे म्हणून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणे, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणे आणि पूजा हवनाच्या नावाखाली तब्बल साडे चार लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विट्यातील महेश मोहन बाबर (रा. भवानी माळ, विटा), संकेत संदीप निकम (रा. घोगाव, ता. पलूस, जि. सांगली) आणि सूरज उपाध्ये या तिघांविरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विट्यातील पाटील वस्ती परिसरात गेल्या काही काळापासून ‘कडेश्वर धाम अध्यात्म संस्था’ नावाच्या आश्रम चर्चेत आहे. हा आश्रम विट्यातील महेश मोहन बाबर, संकेत संदीप निकम आणि सूरज उपाध्ये हे तिघे चालवतात. हे तिघे स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून तेथे येणाऱ्या लोकांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या फसवणूक करतात अशा तक्रारी पुढे येत होत्या. मागच्या आठवड्यात एका महिलेच्या तक्रारीवरून या तिघांना विटा पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले होते. त्यातच, आता हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
View this post on Instagram
पीडित मुलीला शारीरिक आणि पित्ताशयाचा त्रास होता. याचाच गैरफायदा घेत संशयित आरोपी महेश बाबर आणि संकेत निकम यांनी पीडितेला, “संकेत निकम हा शंकर बाबा, महाकाल, बाळूमामा आणि चिले महाराज यांचा अवतार आहे,” असे भासवले. तसेच पीडित मुलीच्या शरीरात अंबाबाई देवीचा संचार येतो, असे सांगून तिला पूजा आणि हवन करण्यास भाग पाडले.
आरोपींनी पीडितेला, “तू मागच्या जन्मी ची नागिन होतीस आणि संकेत बाबा हा नाग होता. तुमच्या दोघांचे लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा जन्म झाला आहे,” असे सांगितले. भोंदूगिरीच्या जाळ्यात ओढून आरोपी संकेत निकम याने विटा येथील एका खोलीवर अल्पवयीन पीडित मुलीवर जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केला. याशिवाय संशयित आरोपी सूरज उपाध्ये याने पीडित मुलीला तोंड न उघडण्याची धमकी दिली. “संकेत बाबा सर्वकाही बघत आहेत, जर कोणाला काही सांगितले तर तुझे व्हिडिओ व्हायरल करेन,” अशी धमकीही दिली.
दरम्यान, पूजा आणि हवनच्या नावाखाली संशयित आरोपी महेश बाबर आणि संकेत निकम यांनी पीडित मुलीच्या वडिलांकडून एकूण 4 लाख 50 हजार रुपये बँक खात्यावर आणि 50 हजार रुपये रोख रक्कम घेतली. हा सर्व मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ असह्य झाल्यानंतर पीडितेने अखेर विटा पोलिस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दिली.
महाराष्ट्र हादरला! शनी अमावस्येच्या पूजेनंतर भोंदूबाबाकडून युवक-युवतीचा खून; श्वान अन् रुमाल…
भोंदू राजेंद्र गडगे याच्याकडे निघाले 200 व्हिडीओ अन् 90 गोळ्या…
महाराष्ट्रील आणखी एका भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
भोंदू अशोक खरात याचा आणखी एक कारनामा, महिलांशी लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी…

