वर्धा पोलिसांचे पथक लपत छपत गेले अन् १७ जणांना रंगेहाथ पकडले; पाहा नावे…

वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले असून, मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखा यांनी २५/०७/२०२३ रोजी पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली वर्धा उपविभागिय पथकासह परीसरात प्रो रेड,जुगार रेड करीता पेट्रोलींग दरम्यान मुखबिरकडुन प्राप्त खबरेवरून पंच व पथकासह पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, बालाजी लालपालवाले तसेच सहाय्यक पोलिस निरीक्षक संताष दरेकर यांचे निर्देशाप्रमाने शिखबेडा सावंगी मेघे राजकुमार बावरी याचे घराकडे पोलिस पथक लपत छपत गेले होते. राजकुमार बावरी याचे घराचे मागे मोकळया जागेत राजकुमार बावरी हा तलवार जवळ बाळगुन दिसला तसेच जुगार खेळणाऱ्या लोकांची खुप मोठी गर्दी दिसली. तेथे पोलिस पथकासह घेराव करून जुगार खेळणाऱ्यांवर छापा टाकला. जुगारी लोकांना पोलिस आल्याची चाहुल लागल्याने काही जुगारी पसार झाले. मोक्यावर जुगार खेळणारे राजकुमार बावरी व त्याचसोबत एकूण १६ जण असे एकुण १७ जण असे सार्वजनिक ठिकाणी ५२ तास पत्यावर मांग पत्याचा जुगार स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता खेळताना रंगेहात मिळून आले. मोक्यावरून आरोपी
१) राजकुमार बेतनसिंग बावरी, वय २९ वर्ष, रा. शिखबेडा समतानगर वर्धा,
२) पुरूषोत्तम शंकरराव घोडे, रा. रंगारी बोरगाव मेघे
३) मुकुल राजू दिघोटे, रा. भामटीपुरा वर्धा
४) तुषार मनोज यादव, रा. भामटीपुरा वर्धा
५) आंनद पंत्रासा `राळे हाराळे, रा. बोरगाव मेघळे
६) कृष्णा अंबादासजी लाकडे, रा. कुरझडी (जामठा)
७) समेश सुखदेवराव मुन,रा. बोरगाव मेघे
८) राजेश कन्हैयालाल ठाकरे, रा.बोरगाव मेघे
९) दिपक गोपीचंद वैद्य, रा.दयाल नगर वर्धा
१०) शुभम कैलासराव किन्नाके, रा. इतवारा बाजार वर्धा
११) पंजाब तालीकराव ठाकरे, रा. सोनगाव स्टेशन
१२) अखील प्रभाकरराव तांबोळी, रा. साईनगर वर्धा
१३) भाऊराव नथ्थुजी पाटील, रा. बोरगाव मेघे
१४) सुधाकर नामदेव चव्हाण, रा. समतानगर वर्धा
१५) राजेंद्र लकडुजी खंतडे, रा. पिपरी पुनर्वसन
१६) प्रकाश लक्ष्मण वाघमारे, रा. बोरगाव मेघे
१७) लखन सुरेशराव चाचरकर, रा. गिटटीखदान बोरगाव मेघे

पोलिसांनी त्यांच्याकडून ५२ ताशपत्ते,न गदी ४०६८० /-रू., १३ मोबाईल व ९ मोटार सायकली, व एक लाखंडी धारदार तलवार असा एकुण ६,५५,६८०/- जा माल आरोपीतांकडून जप्त करून पोलिस स्टेशन सावंगी मेघे येथे कलम १२ महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक नूरुल हसन, डॉ. सागर कवडे अप्पर पोलीस अधीक्षक यांचे आदेशान्वये पोलिस निरीक्षक संजय गायकवाड स्थानीक गुन्हे शाखा याचे मार्गदर्शनात सपोनि. संतोष दरेकर, पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले, अमोल लगड, संतोष दरगुडे, मनोज धात्रक, नरेश पाराशर, गजानन लामसे, राजेश तिवस्कर, यशवंत गोल्हर, संजय बोगा, रितेश शर्मा, विकास अवचट, राकेश आष्टनकर, संघसेन कांबळे, विनोद कापसे यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!