
पुणे शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू; पाहा नियमावली…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलिस प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात मंगळवारी (ता. २६) रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
पुणे शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलने, निदर्शने आणि मोर्चे काढले जात आहेत. यामुळे शहरातील शांतता धोक्यात येऊ नये आणि वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केल्याची माहिती पुढे आली आहे.
पुढील १४ दिवस पुण्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारची आंदोलने, मोर्चे, निदर्शने आणि जाहीर सभा घेण्यास पूर्णपणे बंदी असेल. कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या-काठ्या, दगड, तलवारी किंवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगता येणार नाहीत. याशिवाय सार्वजनिक शांतता भंग करणारे कोणतेही कृत्य, आक्षेपार्ह गाणी, भडकाऊ घोषणाबाजी किंवा चिथावणीखोर भाषणे देता येणार नाहीत. यावर कडक निर्बंध असतील.

Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
जर एखाद्या व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन करून शहरात शस्त्रे किंवा कोणतीही धोकादायक वस्तू बाळगल्याचं आढळून आले तर पोलिस त्या वस्तू तत्काळ जप्त करू शकतात आणि संबंधित व्यक्तीवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. हा आदेश सामान्यतः १४ ते १५ दिवसांपर्यंत लागू ठेवता येतो. जर या १४ दिवसांनंतरही शहरातील परिस्थिती पाहता आदेश पुढे वाढवायचा असल्यास, त्यासाठी राज्य सरकारची रीतसर मंजुरी घ्यावी लागते. पुणेकरांनी या काळात पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नियमावली पुढीलप्रमाणे…
१/- ज्याअर्थी पुणे शहरात जनतेच्या विविध मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे, निदर्शने, बंद व उपोषणा सारखे आंदोलनाचे आयोजन करतात. विविध कारणांमुळे तसेच अतिक्रमण हटवण्याच्या कारवायांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते.
२/- ज्याअर्थी पुणे शहरात होणाऱ्या बकरी ईद तसे च इतर सन उत्सवाचे अनुषंगाने पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था राखणे आवश्यक आहे.
३/- त्याअर्थी, माझी खात्री झाली आहे की, पुणे शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश करणेस पुरेसे व सबळ कारण आहे.
४/- त्याअर्थी, मी, डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस उपआयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर वर नमूद अ.नं. २ च्या आदेशान्वये मला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून व महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून संपुर्ण पुणे शहर पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक २६/०५/२०२६ रोजी ००.०१ वा. पासून ते दिनांक ०८/०६/२०२६ रोजी २४.०० वा पर्यंत १४ दिवसांसाठी खालील नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे.
अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे.
ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.
क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठया, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे प्रतिकात्मक प्रेताचे, पुढा-यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन
करणे.
इ) मोठयाने अर्वाच्च घोषणा देणे, सार्वजनीक टिका करणे, उच्चार गाणी गाणे, वाद्य वाजविणे. फ) पुणे शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलिस अधिका-याच्या मते, शालीनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारे चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तु वापरणे किंवा वस्तु तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारीत करणे जेणे करुन सार्वजनिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथुन टाकणेस कारणीभुत ठरु शकेल.
ग) यामुळे सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालीत आहे.
ह) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७ (१) (२) (३) विरूध्द वर्तन करणे.
५/- महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन १९५१ च्या कलम ३७ चे पोटकलम (३) पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलिस आयुक्त, पुणे शहर यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालीत आहे.
६/- वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही. हा आदेश खाजगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा चौकीदार जे ३.५ फूट पर्यंत लांबीपर्यंतच्या लाठया बाळगत आहेत, इत्यादींना लागू होणार नाही.
७/- सदरचे आदेशाला जाहिररित्या ठळक प्रसिध्दी दयावी.
८/- वर नमुद केलेल्या कालावधीनंतर या आदेशाची मुदत संपली तरीही
आय) गुन्हेगाराची (Reel) रिल बनवुन सोशल मिडीयावर टाकून दहशत पसरविणे किंवा धमकी देणे. अ) कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही सुरु केली जावु शकते, चालु ठेवली जावु शकते किंवा लागु केली जावु शकते.
ब) या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघन संदर्भात दंड, जप्ती किंवा शिक्षा लागु केल्या जावु शकतात. जणु हा आदेश कालाबाहय झाला नाही..
९/- या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधीत व्यक्ती महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल.
सदरचा आदेश माझ्या सही शिक्यानिशी आज दिनांक २३/०५/२०२६ रोजी दिला आहे.
View this post on Instagram
पुणे ग्रामीण आणि बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे गँगवॉर! अक्षय म्हस्के हल्ला प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; पाहा आरोपींची नावे…
IPS विनायक भोसले यांनी बनावट कर्ज टोळीचा केला पर्दाफाश…
महाराष्ट्र पोलिस दलात मोठा फेरबदल; अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…
पुणे बॉम्ब प्रकरण! आरोपीचा ‘क्लीन शेव्ह’चा फंडा अन् उपचारासाठी…

