धक्कादायक! छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच केली आत्महत्या…

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष)‎‎ येथे आणखी एका मराठा युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच ‎‎युवकाने विष‎ ‎घेऊन आत्महत्या ‎‎केल्याने खळबळ उडाली आहे. विजय ‎पुंडलिक राकडे (वय 39 वर्ष, खामगाव, फुलंब्री) असे मराठा‎ आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या ‎युवकाचे नाव आहे.‎

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनात विजय देखील सहभागी होता. मात्र, मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो चिंतेत होता. याच चिंतेत त्याने बुधवारी खामगाव येथील छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच विष घेतले. त्याने विष घेतल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी त्याला‎ तत्काळ खासगी वाहनातून फुलंब्री येथे‎ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला ‎रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती‎ संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात ‎दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मराठा‎ आरक्षणासाठी आपण आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी देखील त्याच्या खिशात आढळून आली आहे.

विजय याने आत्महत्या करण्यापूर्वी एका सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘माझ्या‎ मुलींना, मुलांना शिकवण्यासाठी मी‎पूर्णपणे कटिबद्ध असतानाही माझ्या‎ मुलांना आरक्षण नसल्याने भविष्यात‎ त्यांच्यासाठी मी काही करू शकत नाही‎. येणाऱ्या काळात मराठ्यांना आरक्षण‎ मिळावे, यासाठी मी आत्महत्या करीत ‎आहे.’

दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, हा मुद्दा लवकर मार्गी लागत नसल्याने हताश होऊन युवक आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहे. युवकांनी आत्महत्या करू नयेत असे आवाहन सरकार आणि मनोज जरांगे यांच्याकडून सतत करण्यात येत आहे.

विद्यार्थ्याने फीसाठी पैसे नसल्याने केली आत्महत्या; चिठ्ठीत लिहीले की…

विनायक मेटे यांच्या पुतण्याची गळफास घेऊन आत्महत्या…

जालना लाठीचार्ज प्रकरणी आंदोलकांवर गुन्हे दाखल; पोलिसही जखमी…

Video: लोकसभेत घुसखोरी करणारा अमोल शिंदे आहे कोण?

आयएएस-आयपीएस अधिकारी न झाल्याची खंत; निरीक्षकाची आत्महत्या…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!