मुंबई पोलिसातील IPS डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणात अपघाती निधन…
मुंबई : आयपीएस अधिकारी आणि मुंबई पोलिस दलातील डीसीपी सुधाकर पठारे यांचे रस्ते अपघातामध्ये निधन झाले आहे. तेलंगणातील श्रीशैलम येथून पठारे नागरकुरलूकडे जात असताना त्यांच्या कारचा अपघात झाला. सुधाकर पठारे हे 2011 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सुधाकर पठारे यांच्या अपघाती निधनामुळे महाराष्ट्र पोलिस दलामध्ये शोककळा पसरली आहे. सुधाकर पठारे यांचे पोस्टिंग सध्या मुंबई पोलीस […]
अधिक वाचा...सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण! अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप…
मुंबईः मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे केज-बीड रस्त्यावरील टोल नाक्यावरून अपहरण झाले होते, त्यावेळी सरपंच यांची गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला कोयता लावला गेला आणि अपहरण झाले. त्यानंतर या व्यक्तीने संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना याबाबत घटनाक्रम सांगितला होता. धनंजय देशमुख यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास त्या व्यक्तीला सांगितले […]
अधिक वाचा...कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकर याच्यावर कोर्टात वकिलानेच केला हल्ला…
कोल्हापूर : कोल्हापूर सत्र न्यायालयात मोठ्या पोलिस बंदोबस्तात सुनावणीसाठी आलेल्या प्रशांत कोरटकर हल्ला झाला आहे. न्यायालयीन परिसरातच वकिलानेच प्रशांत कोरटकरला पोलिस बंदोबस्तात असताना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, पोलिसांनी वेळीच वकिलांना आवरल्याने मोठा अनर्थ टळला. कोर्टामध्ये युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर वकील अमित कुमार भोसले यांनी प्रशांत कोरटकरवर हल्ला करण्याचा प्रयत्न […]
अधिक वाचा...क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना दीड लाख रुपयांची लाच घेताना पकडले रंगेहात…
परभणी : परभणी जिल्ह्यात एसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली असून, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. स्विमिंग पूल बांधण्यास परवानगी देण्यासाठी कविता नावंदे यांनी अडीच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील, दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. परभणी जिल्ह्यातील क्रीडा विभागात लाचप्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. एका क्रीडा स्पर्धेचे बिल आणि स्विमिंग […]
अधिक वाचा...सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे आरोपींनी केले कबूल; हत्येचे सांगितले कारण…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली आरोपींनी दिली आहे. हत्याप्रकरणाच्या खटल्याच्या बुधवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड गँगच्या तीन जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. त्यामुळे बीडचा आका म्हणून कुख्यात झालेल्या वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा […]
अधिक वाचा...जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक…
सातारा: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांकडून आज (शुक्रवार) अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांचा मागणी केली होती. यामध्ये 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी अटक केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे एका […]
अधिक वाचा...बीडमध्ये महिलांचा समावेश असलेल्या गुन्हेगारी टोळीवर मकोका…
बीड : बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड याच्या टोळीवर मकोका लावल्यानंतर आता आणखी एका सहा जणांच्या गुन्हेगारी टोळीवर मकोका (Mcoca) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या टोळीत तीन महिलांचाही समावेश आहे. बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी […]
अधिक वाचा...राज्यातील वाहनांच्या HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाची बातमी…
मुंबई: राज्यातील जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट (HSRP) बसवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या सोसायटी किंवा इमारतीतील २५ पेक्षा जास्त वाहनधारकांनी एकत्रित नोंदणी केली, तर अधिकृत एजन्सी त्या सोसायटीत जाऊन थेट HSRP बसवणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकरणांमध्ये वाहनधारकांकडून फिटमेंट शुल्क आकारले जाणार नाही. २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी […]
अधिक वाचा...बीड! शिक्षक धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई…
बीड : बीडच्या आश्रमशाळेतील शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आत्महत्या केल्यानंतर खळबळ उडाली आहे. शिक्षक नागरगोजे यांच्या आत्महत्या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष विक्रम मुंडे, सचिव अतुल मुंडे व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक धनंजय नागरगोजे यांनी अठरा वर्ष पगार मिळाला नाही म्हणून संस्था चालकासह इतर काही जणांचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहून […]
अधिक वाचा...नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी; 80 जणांना अटक…
नागपूर: नागपूरमध्ये सोमवारी (ता. १७) दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले आणि 80 जणांना अटक केली आहे. आक्षेपार्ह व्हिडीओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाऊंट पोलिसांच्या रडारवर आहेत. कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा,नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर […]
अधिक वाचा...
