राज्यातील वाहनांच्या HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाची बातमी…

मुंबई: राज्यातील जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट (HSRP) बसवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या सोसायटी किंवा इमारतीतील २५ पेक्षा जास्त वाहनधारकांनी एकत्रित नोंदणी केली, तर अधिकृत एजन्सी त्या सोसायटीत जाऊन थेट HSRP बसवणार आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकरणांमध्ये वाहनधारकांकडून फिटमेंट शुल्क आकारले जाणार नाही.

२०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP बसवण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी वाहनधारकांना घरपोच सेवा हवी असल्यास त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात होते. दुचाकीसाठी 125 रुपये आणि चारचाकीसाठी 250 रुपये असे फिटमेंट शुल्क होते. मात्र, नवीन निर्णयानुसार सोसायटी नोंदणी केल्यास हे शुल्क पूर्णतः माफ होईल. वाहनधारकांना नंबर प्लेटसाठी केंद्रांवर जाण्याचा त्रास कमी व्हावा आणि गर्दी नियंत्रित रहावी यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.

HSRP साठी निश्चित दर वाहनाच्या प्रकारानुसार ठरवले गेले आहेत. दुचाकीसाठी 531 रुपये, तीनचाकीसाठी 590 रुपये आणि चारचाकी/व्यावसायिक वाहनांसाठी 879 रुपये. राज्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना तीन विभागांमध्ये विभागून, स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून HSRP बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १८ लाखांहून अधिक वाहनधारकांनी HSRP घेतली असून, दररोज सरासरी १०,००० नवीन नोंदण्या होत असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

HSRP बसवण्यास विलंब केल्यास दंड भरावा लागू शकतो, त्यामुळे वाहनधारकांनी त्वरित नोंदणी करून ही प्रक्रिया पूर्ण करावी. सोसायटीच्या माध्यमातून सामूहिक नोंदणी केल्यास अतिरिक्त खर्च वाचणार आहे.

नंबर प्लेट कुठे मिळेल…
transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल.
यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करावी लागेल
तुमच्या नजीकचे फिटमेंट सेंटर सिलेक्ट करा.
आपल्याला मिळालेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरला जा. तिथे गेल्यावर वेंडर आपल्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देईल. नंबर प्लेट बसवून त्याची नोंद वेंडर वाहन प्रणालीत करेल.

अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवा…
शासनाचे अधिकृत वेंडर वगळता इतर कोणत्याही ठिकाणाहून ही नंबर प्लेट बदलून घेऊ नये. इतर ठिकाणाहून एचएसआरपी सारखी दिसणारी नंबर प्लेट बसवली तर त्या नंबर प्लेटच्या पिन नंबरची नोंद वाहन प्रणालीत होणार नाही. वाहन प्रणालीत आपली एचएसआरटी पेंडींगवर दिसेल. त्यामुळे अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवा.

FASTag नवीन नियम लागू; दंड टाळण्यासाठी काय करावे? घ्या जाणून…

वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक, किंमत किती अन् कुठे मिळेल? घ्या जाणून…

महाराष्ट्रात वाहनांशी संबंधित नियम बदलणार; अन्यथा 10 हजार रुपयांचा दंड…

खासगी वाहनांवर ‘पोलिस’, ‘महाराष्ट्र शासन’ लिहाल तर कारवाई…

वाहनांवरील नंबर प्लेट बाबत महत्त्वाची माहिती घ्या जाणून…

वाहनधारकांना मोठा दिलासा! डिजिलॉकर आणि एम परिवहनवरील डिजिटल कागदपत्रे ग्राह्य…

वाहतूकीला शिस्त! पोलिसांनी गाडी उचलल्यास किती होणार दंड…

राज्यातील वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!