
हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…
मुंबईः मुलाला रिक्षावाले आणि फेरीवाले लाथा-बुक्क्यांनी तुडवत आहे. लेकाला वाचवण्यासाठी आई त्यांच्या अंगावर पडली तर बाप हात जोडून विनवण्या करत होता. पण, मारहाण करणाऱ्यांना किव आली नाही. अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या व्यक्तीला रिक्षावाले आणि फेरीवाल्यांनी मारहाण केली, त्याचा मृत्यू झाला. आकाश माईन असे त्याचे नाव असून, तो मनसेचा कार्यकर्ता आहे. मुंबईतील मालाड पूर्व भागात रविवारी (१३ ऑक्टोबर) ही घटना घडली आहे.
रिक्षावाले आणि फेरीवाल्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आकाश दत्तात्रय माईन (वय २८) याला ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, त्यांच्या पाय, हात, पोट आणि कंबरेवर गंभीर जखमा झाल्या होत्या. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आकाश माईन हा स्कूटरवरून पत्नीसोबत कार खरेदी करण्यासाठी गेला होता. मालाड रेल्वे स्टेशनजवळ एका रिक्षाचालकाने अचानक कट मारला. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि वाद वाढला गेला.
रिक्षाचालकाने त्यांच्या इतर रिक्षाचालक मित्रांना आणि आजूबाजूच्या फेरीवाल्यांना बोलावून घेतले. त्यानंतर आकाश माईन याला त्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तिथे आकाशचे आईवडीलही आले. त्यांनी मारहाण करणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. बाप विनवण्या करत होता, आई मुलाला वाचवण्यासाठी धडपडत होती. रिक्षावाले आणि फेरीवाले आकाशवर तुटून पडले. आकाशचे वडील त्यांच्यासमोर हात जोडून विनवण्या करत होते. तर आई त्याच्या मारापासून वाचवण्यासाठी आकाशच्या अंगावर पडली. मात्र, मारहाण करणाऱ्यांनी आकाशच्या वडिलांनाही मारले. हा सगळा प्रकार व्हिडीओत कैद झाला आहे.
पोलिसांनी आकाशची पत्नी अनुश्री माईन यांच्या तक्रारीवरून दिंडोशी पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी काही पथक तयार करून आरोपींचा शोध घेतला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने ९ आरोपींना अटक केली. त्यापैकी ६ जणांची ओळख पटली असून, अविनाश नामदेव कदम, अमित जोगिंदर विश्वकर्मा, आदित्य दिनेश सिंह, जयप्रकाश दीपक आमटे, राकेश ढवळे आणि साहिल कदम अशी त्यांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
Trigger warning: Graphic details shown in the video
In Malad East, a tragic road rage incident unfolded when a man was brutally beaten to death in front of his father, mother, and wife.
In a desperate bid to protect him, his mother lay over his body, trying to shield him. The… pic.twitter.com/QIZNj1Lfdu
— Mid Day (@mid_day) October 14, 2024
हृदयद्रावक! आईचा दुसरा विवाह अन् अनाथाश्रामत ठेवलेल्या चिमुकल्याची आत्महत्या…
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात गरबा किंगने दांडिया खेळताना मुलासमोरच सोडला जीव…
हृदयद्रावक! महिला डॉक्टरची 6 महिन्यांच्या चिमुकल्यासह गोदावरी नदीत उडी…
हृदयद्रावक! पत्नीचं निधन अन् चार मुलींसह बापाने संपवलं स्वत:ला…
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…

