पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा…
पुणे : पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिला तनिषा भिसे यांना उपचार नाकारल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील नागरिकांनी आंदोलन करताना संताप व्यक्त केला आहे. दीनानाथ रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर प्रचंड टीका होत होती. त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रही रद्द व्हावे, अशी मागणी जोर धरत होती. याच पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रातून दबाव वाढल्यानंतर डॉ. सुश्रुत […]
अधिक वाचा...मोठी बातमी! दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने डिपॉझिटबाबत घेतला मोठा निर्णय…
पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे भाजप आमदाराचे स्वीय सहाय्यक असलेले सुशांत भिसे यांच्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा जुळ्या बाळांना जन्म दिल्यानंतर मृत्यू झाला आहे. या घटनेने पुण्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर आता रुग्णालयाचे ट्रस्टी धनंजय केळकर यांनी पत्रक जारी करत यापुढे दीनानाथ रुग्णालयात इमर्जन्सीमधील कुठल्याही पेशंट कडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही, अशी माहिती […]
अधिक वाचा...पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयााबाबत मोठी माहिती समोर…
पुणे: पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालया प्रशासनामुळे तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. नागरिकांमध्ये संताप पसरला असून, आंदोलने केली आहेत. त्यानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले योजनेचा लाभ मिळत नाही. शिवाय, रुग्णालयाने 27 कोटी रुपयांचा कर थकवला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात महात्मा […]
अधिक वाचा...दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला अखेर नोटीस; मुख्यमंत्री म्हणाले…
पुणे : पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी संतापाची लाट पसरली आहे. हॉस्पिटल रुग्णालयाबाहेर आज विविध पक्षांनी व महिला कार्यकर्त्यांनी आंदोलन करत रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोग्य उपसंचालक कार्यालायाने मंगेशकर रुग्णालयाला नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये बॅाम्बे नर्सिंग ॲक्टच्या तरतुदींच उल्लंघन केल्याने आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही नोटीस देण्यात आली आहे. […]
अधिक वाचा...दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती मृत्यू प्रकरणी दिले स्पष्टीकरण…
पुणे : पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशांअभावी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून न घेतल्यामुळे भाजप आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक असलेल्या सुशांत भिसे यांच्या पत्नीला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होत आहे. प्रसुतीसाठी रूग्ण दाखल करून घेताना दहा लाख रूपये भरण्यास सांगत उपचार करण्यास रुग्णालयाने नकार दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात भिसे […]
अधिक वाचा...पुणे! गर्भवतीच्या उपचारासाठी रग्णालयाने मागितले 10 लाख, महिलेचा मृत्यू…
पुणे: पुणे शहरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारासाठी १० लाख रुपयांची मागणी करत वेळेत दाखल करून न घेतल्याने एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तनिषा सुशांत भिसे (वय २७) या गर्भवती महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर उपचाराअभावी आपला जीव गमावला. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तनिषा भिसे यांना प्रसूतीसंबंधी तातडीचा त्रास […]
अधिक वाचा...बीडमधील गँगला सुतासारखं सरळ करणार: अजित पवार
बीड: बीडमध्ये सगळ्या गँग आहेत, राखेची गँग, वाळूची गँग या सगळ्या गँग आहेत. या सगळ्या गँगना सुतासारख्या सरळ करणार आहे, असा इशारा राज्याची उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांनी आज (बुधवार) दिला आहे. अजित पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत. युवा संवाद मेळाव्यातून अजित पवार यांनी राख गँगला सुतासारखं सरळ करणार असल्याचे सांगितले. […]
अधिक वाचा...चालकासोबत मालकीणीचं प्रेमसंबंध; महिलेच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट…
धाराशिव: धाराशीव जिल्ह्यातील कळंब येथे मनीषा बिडवे (वय 39) या महिलेचा राहत्या घरात लोखंडी हातोडीने मारून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. ही हत्या नेमकी कुणी आणि कशासाठी केली, याची माहिती समोर आली आहे. मनीषा बिडवे यांचे घर बाहेरून कुलूपबंद असल्याचे दिसले. घराच्या परिसरात […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! प्रेमविवाहाच्या साखरपुड्याला पाहुणे आले अन् अंत्ययात्रेला जावे लागले…
नांदेड: एका युवक बोहल्यावर चढण्याआधीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना मेंढला बुद्रूक (ता. अर्धापूर, जि. नांदेड) गावात घडली आहे. साखरपुड्याला आलेल्या पाहुण्यांना अंत्ययात्रेला हजेरी लावावी लागली आहे. विशेष म्हणजे या तरुणाचा प्रेम विवाह होणार होता. वधू मुलगी देखील युवकाची नातेवाईक होती. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीने प्रेम विवाह होणार होता. दोन्ही कुटुंबं आनंदी होते, पण त्यांचा हा आनंद […]
अधिक वाचा...बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…
बीड: बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका आत्महत्येचा बदला म्हणून ही हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे. आरोपीच्या भावाने ज्या झाडाखाली गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्याच झाडाखाली घेऊन जात या युवकीच दगडाने ठेचून हत्या केली आहे. रविवारी (ता. ३०) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास […]
अधिक वाचा...
