जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक…

सातारा: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांकडून आज (शुक्रवार) अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांचा मागणी केली होती. यामध्ये 1 कोटी खंडणीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी अटक केली. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहेत. त्यांनी एका महिलेला नग्न फोटो पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित महिलेने मीडियासमोर येऊन जयकुमार गोरेवर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात आता मोठा ट्वीस्ट आला आहे. ज्या महिलेने जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सातारा पोलिसांनी आज सकाळी आठ वाजता मोठी कारवाई करत महिलेला अटक केली आहे. संबंधित महिलेनं हे प्रकरण मिटवण्यासाठी गोरे यांच्याकडे तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. यातील एक कोटींची रक्कम स्विकारताना संबंधित महिलेला अटक करण्यात आली आहे.

जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले असताना, तक्रारदार महिलेला अशाप्रकारे अटक झाल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. यामागे काही कटकारस्थान आहे का? अशाही चर्चा रंगल्या आहे. सातारा पोलिसांनी अद्याप याबाबत अधिकृत माहिती दिली नाही.

प्रकरण आहे काय…
सातारा जिल्ह्यातील माण-खटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे यांनी 2016 पासून फक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यानेच आपल्याला त्रास दिल्याचा आरोप महिलेने केला होता. तर आपल्याला त्रास देण्यासाठी गोरे यांनी त्यांचे नग्न फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवले, असाही दावा सदर महिलेने केला होता. या त्रासाला कंटाळून सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंद झाला आहे. पण अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण त्यांचा अटकपर्व जामीन अर्ज फेटाळल्याने त्यांना अटक झाली होती. ज्यानंतर गोरे यांना दहा दिवसांची जेलमध्येही जावे लागले, असे सदर महिलेने एका पत्रात म्हटले होते.

2019 मध्ये सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने या प्रकरणात जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती. जे रेकॉर्ड होते ते देखील हटवण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती गोरे यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र,जयकुमार गोरे यांना विवस्त्र फोटो पाठवल्याप्रकरणी त्यावेळी न्यायालयात महिलेची माफी मागितली होती, असा आरोप आता केला जात आहे. त्यानंतर मंत्री जयकुमार गोरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.

दहा दिवसांची जेलवारीही करावी लागलेल्या गोरे यांनी याप्रकरणी सातारा जिल्हा न्यायालयात माफीनामा दिला होता अशी माहिती आहे. मात्र, आता पुन्हा त्रास दिला जातोय अशीही तक्रार पीडित महिलेने केली आहे. तसेच 2016 मधील दाखल केलेली तक्रार व्हॉट्सअॅप ग्रुपवर 2025 पासून व्हायरल करण्यात येत आहे. यामुळे आपले नाव आता उघड झाल्याचेही या महिलेचे म्हणणे आहे. तर आपल्यावर दबाव आणण्यासाठी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची खोटी तक्रार गोरे यांनी पीए अभिजित काळेमार्फत केल्याचा दावाही या महिलेने केला होता.

पुणे! हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणात नवा ट्वीस्ट…

पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!

राज्यातील वाहनांच्या HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाची बातमी…

बीड! शिक्षक धनंजय नागरगोजे प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई…

पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!