Video: पुणे महापालिका उपअभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये नोटांचे बंडल…

पुणे (संदिप कद्रे): पुणे महापालिकेच्या पथ विभागातील एका उपअभियंत्याच्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये 500 रुपयांच्या बंडलासह मोठी रक्कम सापडली आहे. आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले असून, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आम आदमी पक्षाचे पिंपरी-चिंचवडचे शहराध्यक्ष रविकांत काळे हे काही कामानिमित्ताने गेले होते. त्यावेळी एका उपअभियंत्याच्या ड्रॉवरमध्ये एक व्यक्ती संशयास्पद काहीतरी ठेवून गेली हे लक्षात आल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. कार्यकर्ते थेट अभियंत्याच्या केबिनमध्ये शिरले आणि त्या अभियंत्याच्या हालचालीवरुन संशय आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी अभियंत्याला काही प्रश्न विचारले, मात्र अभियंता उत्तरं देत नव्हता. त्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट अभियंत्याच्या टेबलचा ड्रावर उघडला तर 500 च्या नोटांचे बंडल सापडले. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी अभियंत्याला जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी काही उत्तर दिलं नाही. ठेकेदाराचे पैसे असल्याचे कार्यकर्त्यांने व्हिडीओत सांगितले आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांना फोनकरुन संपूर्ण प्रकार सांगितला. कार्यकर्त्यांनी रितसर महापालिकेच्या या अभियंत्याची तक्रार केली आहे.

दरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांना गलेलठ्ठ पगार असतानाही अनेकदा लाच मागतानाचे प्रकार समोर आले आहेत. पुणे पालिकेच्या अनेक अधिकाऱ्यांना लाच स्विकारताना रंगेहात पकडल्याचे प्रकार समोर आले आहेत. मात्र तरीही महापालिकेत असे प्रकार सुरु असल्याचं या व्हिडीओतून दिसत आहे.

दुय्यम निबंधकाच्या घरात मिळाले मोठे घबाड…

नाशिकमध्ये 8 कंत्राटदारांवर आयकर विभागाची धाड; घबाड हाती…

रेल्वे अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले अन् सापडले मोठे घबाड…

Video: ‘एसीपी’साठी लाखाची लाच घेणारा अडकला ‘एसीबी’च्या जाळ्यात…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!