हडपसर पोलिसांकडून परप्रांतीय टोळी गजाआड, लाखो रुपयांचे मोबाईल जप्त…

पुणे : पुणे शहरामध्ये गणेशोत्सवादरम्यान गर्दीमध्ये नागरिकांचे मोबाईल चोरण्याऱ्या परप्रांतीय टोळीला गजाआड करण्यात हडपसर पोलिसांना यश आले आहे. अटक करण्यात आलेल्या टोळीकडून तब्बल 16 लाख रुपये किंमतीचे 52 मोबाईल संच जप्त करण्यात आले आहे. हडपसर पोलिसांनी दोन दिवसात दोन टोळ्यांमधील 9 आरोपींना अटक करुन 72 मोबाईल जप्त केले आहेत.

नागरिकांचे मोबाईल चोरणाऱ्यांना अटक करण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करुन चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तपास पथक व पोलिस मित्र यांच्याकडून 26 सप्टेंबर रोजी गाडीतळ बस स्टॉप, भाजी मंडई परिसरात पेट्रोलींग करण्यात येत होते. त्यावेळी पोलिस अंमलदार अजित मदने व कुंडलीक केसकर यांना माहिती मिळाली की मोबाईल चोरी करणारे संशयित अन्नती नगर कॅनॉल येथे थांबले आहेत.

पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी जाऊन सापळा रचला. शामकुमार संजय राम (वय 25 रा. तीनपहाड, नया टोला, पंचायत भवन, ठाणा राजमहल जि. सायबगंज, झारखंड), विशालकुमार गंगा महातो (वय 21 रा. तीन पहाड बाबुपुर, जि. सायबगंज, झारखंड), बादलकुमार मोतीलाल महातो (वय 25 रा. नया टोला, जि. सायबगंज, झारखंड), विकीकुमार गंगा महातो उर्फ बादशाह नोनीया (वय 19 रा. बाबुपुर जि. सायबगंज, झारखंड) यांना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 12 मोबाईल संच सापडले. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांचे दोन साथीदार गोपी महातो, राहूल महातो (रा. तिनपहाड, जि. सायबगंज, झारखंड) हे 25 सप्टेंबर रोजी येरवडा येथून निघून गेल्याचे सांगितले.

आरोपी मोबाईल चोरीचा पूर्व नियोजीत कट करुन झारखंड येथून पुणे शहर परिसरात आले होते. पुण्यात गणेशोत्सवात जास्त गर्दी असते. त्यादरम्यान मोबाईल चोरी करण्यासाठी आरोपी 12 सप्टेंबर रोजी तीनपहाड स्टेशन येथे एकत्र भेटले. त्यानंतर ते हाटीया एक्सप्रेसने 14 सप्टेंबरला पुणेस्टेशन येथे आले. त्यानंतर त्यांनी पुणे शहराच्या हडपसर, येरवडा, विश्रामबाग, फरासखाना, बंडगार्डन, स्वारगेट, फरासखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत तसेच इतर ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. आरोपींनी मंडई परिसर, चित्रा चौक भाजी मंडई व शहरातील विविध ठिकाणी हातचालाखी करुन मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता घरातून 40 मोबाईल संच जप्त केले आहेत. हडपसर पोलिस ठाण्यातील तपास पथकाने चार दाखल गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून 16 लाखांचे 52 मोबाईल संच जप्त केले आहे. पोलिसांनी दोन दिवसांमध्ये 72 मोबाईल संच जप्त करुन 9 परप्रांतियांना अटक केली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार मनोज सकट करीत आहेत.

अटक केलेल्या आरोपीपैकी विकीकुमार गंगा महातो उर्फ बादशाह नोनिया व विशालकुमार गंगा महातो हे सराईत गुन्हेगार आहेत. विकीकुमार याच्यावर तीन पहाड थाना जि. पहाडगंज अनुमंडल राजमहल येथे आयपीसी 376 (D)(A) नुसार सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो फरार आहे. तर विशालकुमार याच्यावर तीन मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

संबंधित कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलिस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त परिमंडळ 5 विक्रांत देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संदीप शिवले यांच्या सुचनेप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलिस अंमलदार सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, सचिन गोरखे, प्रशांत टोणपे, अजित मदने, चंद्रकांत रेजीतवाड, मनोज सुरवसे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, रशिद शेख, पोलिस मित्र अविनाश ढगे, शुभम खाडे, कावेरी फाळके, पुनम काळे, प्रतिक माने यांच्या पथकाने केली.

पुणे शहरात आरोपी नशा भागविण्यासाठी करायचा मोबाईल चोरी; 32 मोबाईल हस्तगत…

पुणे शहरात मोबाईल चोरांना पकडण्यात मुंढवा पोलिसांना यश…

लोणीकंद पोलिसांनी ऍपल कंपनीचे मोबाईल फोन चोरीचा गुन्हा केला उघड…

स्वारगेट पोलिसांनी मोबाईल चोरी करणाऱ्या चोरट्यांना केले जेरबंद…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!