गँगस्टर शरद मोहोळ याचा CCTVसमोरच का केला खून…

पुणे : कोथरूड येथे गँगस्टर शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशीच गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. पण, आरोपींनी सीसीटीव्ही असलेल्या परिसरातच खून केला. यामागे त्यांचा उद्देश दहशत निर्माण करण्याचा होता असं तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितले. […]

अधिक वाचा...

पुणे शहरात वाहतूकीत प्रायोगिक तत्वावर बदल; जाणून घ्या,पर्यायी मार्ग कोणते…

पुणे : पुणे महापालिकेकडून कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल कमकुवत झाल्याने तो पाडून नव्याने बांधण्यात येणार असल्यामुळे वाहतुकीसाठी तो बंद करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहे. साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल हा सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांचेकडून […]

अधिक वाचा...

पुणे शहरात कंपनीत एचआर पदावर काम करणाऱ्या युवतीवर बलात्कार…

पुणे : पुणे शहरातील एका कंपनीत एचआर पदावर काम करत असलेल्या युवतीला भेटण्यासाठी बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. ६) दुपारी तीनच्या सुमारास खराडी येथील एका अपार्टमेंटमध्ये घडली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एका युवकावर गुन्हा दाखल केला आहे. वडगाव शेरी येथे राहणाऱ्या २४ वर्षीय पीडित युवतीने मंगळवारी (ता. ९) चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद […]

अधिक वाचा...

दुचाकी अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू; दुचाकीचे दोन तुकडे…

गडचिरोली : गडचिरोली-चंद्रपूर मार्गावर मुरखळा गावाजवळ मंगळवारी (ता. ९) रात्री ९ च्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन युवकांचा मृत्यू झाला आहे. तिघे युवक एकमेकांचे नातेवाईक असन, त्यांची वये २० ते २३च्या दरम्यान होती. पोलिस पुढील तपास करत आहेत. नवीनच घेतलेल्या दुचाकीवरून तिन्ही युवक गडचिरोलीच्या दिशेने येत होते. मुरखळा गावाजवळ समोरून येणाऱ्या ट्रकला जोरात धडक बसली. […]

अधिक वाचा...

शिक्षिकेला खंडणी मागून तिचा विनयभंग प्रकरण न्यायालयात…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कुर्ली येथील केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेतील एका सहाय्यक शिक्षिकेला खंडणी मागून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पीडित शिक्षिकेच्या लेखी तक्रारीवरुन आरोपी माजी सरपंच विलास राजन्ना बडगुलवार (वय 48), सतिष लचमारेड्डी गड्डमवार (वय 49), सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर (वय 45), सहाय्यक शिक्षक किसन किनाके (वय 50) […]

अधिक वाचा...

कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाची कौशल्यपुर्ण सुपरफास्ट कामगिरी…

पुणे (संदीप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशन तपास पथकाने कौशल्यपुर्ण सुपरफास्ट कामगिरी करत नेहमीच शिवीगाळ करणा-या दारुड्या मित्राचा खुन करणा-या आरोपीस ८ तासात जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. कोंढवा पोलिस ठाणेच्या हद्दीत कामठे पाटील नगर येथील हातीमी हिल्स सोसायटीच्या मागील निर्जळ स्थळी एका व्यक्तीच्या तोंडावर व मारहाण करुन, गळा आवळून खुन करुन […]

अधिक वाचा...

Video: हातामध्ये बंदुका घेऊन थेट चॅनेलच्या स्टुडिओत घुसले अन्…

न्यूयॉर्क: इक्वाडोरमध्ये (लॅटीन अमेरिका) एका टीव्ही चॅनेलच्या थेट प्रक्षेपणादरम्यान13 बंदुकधारी व्यक्ती घुसले आणि त्यांनी अँकरला धमकवायला सुरुवात केली होती.13 बंदूकधारी व्यक्तींनी मंगळवारी (ता. 9) थेट प्रक्षेपण थेट प्रक्षेपण सुरु असताना टीव्ही स्टुडिओवर हल्ला केला. या 13 जणांवर दहशतवादाचा आरोप लावण्यात येणार आहे, अशी माहिती इक्वेडोर सरकारने माहिती दिलीय इक्वाडोरमध्ये पोर्ट सिटी गुआयाकिलमध्ये टीसी टेलिव्हिजन नेटवर्कच्या […]

अधिक वाचा...

कंपनीची सीईओ असलेल्या आईने केला चिमुकल्याचा खून; कारण…

पणजी (गोवा): एका स्टार्टअप कंपनीची सीईओ असलेल्या सूचना सेठ या महिलेने स्वतःच्या चार वर्षांच्या चिमुकल्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरूतून ती गोव्यात आली होती. गोव्यात हत्या केल्यानंतर बंगळुरूला मुलाचा मृतदेह बॅगेत भरून कॅबने जात असताना तिला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. सूचना सेठ ही महिला एका स्टार्टअप कंपनीची मुख्य […]

अधिक वाचा...

अश्लील व्हिडिओ माझ्याकडे असल्याचे केअर टेकर मुलगी म्हणाली अन्…

मुंबई: खार परिसरात घरात एकटे राहणाऱ्या वृद्ध नागरिकांना अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपये खंडणी मागणाऱ्या चार जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात खार पोलिसांना यश मिळाले आहे. खार पोलिसांनी याप्रकरणी केअर टेकर मुलगी आणि तिच्या इतर साथीदारांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. नीतू (वय 20), अनिल चौहान (वय 32), किरण नायर (वय […]

अधिक वाचा...

मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY…

पुणे : गँगस्टर शरद मोहोळ याची लग्नाच्या वाढदिवशीच घराजवळ हत्या करण्यात आली. शरद मोहोळ सोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याबाबतचा तपास सुरू आहे. शरद मोहळ हत्याप्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात महत्त्वाची माहिती सादर करण्यात आली आहे. मोहळच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेले […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!